Shane Bond Statement About Arjun Tendulkar ESAKAL
क्रीडा

संघात स्थान मिळणं अन्... अर्जुन तेंडुलकरबाबत शेन बाँडचं मोठं वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) पाच वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) गुणतालिकेत तळात रहावे लागले होते. दरम्यान, मुंबईचा संघ यंदाच्या हंगामात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरमुळेही (Arjun Tendulkar) कायम चर्चेत राहिला. साखळी सामन्यातील अखेरच्या सामन्यापर्यंत अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण (IPL Debut) करणार का हीच चर्चा होती.

मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिड, रमनदीप सिंग, संजय यादव, कुमार कार्तिकेय, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स यांना अंतिम 11 च्या संघात खेळण्याची संधी दिली. मात्र अर्जुन तेंडुलकर मात्र बेंचवर बसूनच होता.

अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फक्त दोन टी 20 सामने खेळले आहेत. याचबरोबर तो टी20 मुंबई लीगमध्येही दिसला होता. तरी देखील त्याला मुंबई इंडियन्सने एकही सामना खेळवला नाही. मुंबईने हंगामातील अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध वानखेडेवर खेळला.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बाँडने (Shane Bond) अर्जुन तेंडुलकरबाबत आपले मत व्यक्त केले. मुंबई इंडियन्सने त्याला अंतिम 11 च्या संघात का स्थान देण्यात आले नाही याबाबत देखील आपल मत व्यक्त केले. शेन बाँडच्या मते अर्जुन तेंडुलकरला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अजून काम करायला हवे.

शेन बाँड म्हणाला की, 'अर्जुन तेंडुलकरला काही गोष्टींवर काम करावे लागणार आहे. तुम्ही ज्यावेळी मुंबईसारख्या संघाकडून खेळता त्यावेळी तुमची संघात निवड होणे आणि प्रत्यक्ष अंतिम 11 च्या संघात स्थान मिळणे याच्यात खूप फरक आहे. त्याला अजून आपली बरीच कौशल्ये तासावी लागणार आहेत.'

बाँड पुढे म्हणाला, तुम्ही ज्यावेळी या दर्जाचे क्रिकेट खेळत असता त्यावेळी सर्वांना खेळण्याची संधी देण्यात काही मर्यादा येतात. तुम्हाला संधी देण्याची नाही तर संधी कमावण्याची गरज असते. अर्जुनला संघात स्थान मिळवण्यापूर्वी अजून त्याच्या बॅटिंगवर आणि फिल्डिंगवर बरेच काम करावे लागणार आहे. मला आशा आहे की तो याच्यावर काम करेल आणि संघातील आपली जागा मिळवले.'

यापूर्वी खुद्द सचिन तेंडुलकरने सांगितले होते की त्याने अर्जुनला संघात स्थान मिळण्याबाबत नाही तर त्याच्या खेळातील कौशल्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. सचिन म्हणाला होता, 'हा एक वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करतो किंवा मला काय वाटते हे महत्वाचे नाही. हंगाम आता संपला आहे. जर संघ निवडीबाबत विचाराल तर मी त्यात कधीच भाग घेत नाही. तो संघ व्यवस्थापनाचा अधिकार आहे. इथं अशाच प्रकारे काम चालतं.'

जगातिक क्रिकेटच्या इतिहासातील महान क्रिकेटपटूंच्या यादीत वरचे स्थान असणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरला यश मिळवण्यासाठी कष्ट करत राहण्याचा सल्ला दिला आहे.

तो म्हणाला की, 'मी ज्यावेळी अर्जुन तेंडलुकरबरोबर बोलतो त्यावेळी त्याला तुझा प्रवास हा खडतर असणार आहे असे सांगत असतो. तू क्रिकेट आवडते म्हणून क्रिकेट खेळायला सुरूवात केली आहेस. तू कष्ट करणे साडले नाहीस तर त्याची फळे तुला नक्कीच मिळतील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT