Shane Warne esakal
क्रीडा

Shane Warne ने 12 तासांपूर्वीच मित्राला वाहिली होती श्रद्धांजली

ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. दरम्यान, वार्न यांनी निधनापूर्नीच म्हणजे 12 तासांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रॉड मार्श यांनी ट्वीट करत श्रद्दांजली वाहिली होती. (Shane Warne Last Tweet )

वार्न यांनी मार्श गेल्याची बातमी ऐकून दुःख झाल्याचे म्हणत तो आमच्या महान खेळातील एक आख्यायिका होता. याशिवाय अनेक तरुण मुला-मुलींसाठी एक प्रेरणा स्त्रोत असल्याचे म्हटले होते. रॉडला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्याने विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघातील खेळाडूंना खूप काही दिले आहे. असे ट्वीट केले होते. मात्र, काही तासांनंतरच वॉर्न यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे क्रिडा विश्वात चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. 13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेलेल्या शेन वॉर्ननं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. वनडेच 194 या दिग्गजाच्या खात्यात 293 विकेट्स आहेत. ज्या क्रिकेट संघात जलदगती गोलंदाजांचा भरणा आपण आजही पाहतोय त्यात या फिरकीपटून आपला हातखंडा दाखवून दिला. त्याच्या रुपात क्रिकेट जगताने महान क्रिकेटर गमावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT