sharad pawar won celebration team india won sakal
क्रीडा

Sharad Pawar : पाकिस्तानच्या पराभवानंतर शरद पवारांचा जल्लोष, Video होतोय व्हायरल

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने तुफानी खेळी खेळत शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला.

Kiran Mahanavar

Sharad Pawar Ind Vs Pak Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने तुफानी खेळी खेळत शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. देशातील अनेक महानगरांमध्ये रस्त्यावर येऊन लोकांचा जल्लोष सुरु झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही या जल्लोषाचा मोह आवरला नाही.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा शरद पवार यांनीही घरी बसून आनंद घेतला. हार्दीक पांड्याने शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. यावर शरद पवारांनी हात उंचावत जल्लोष साजरा केला. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे आपल्या नातवांसोबत टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे.

पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 147 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना १९.४ षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला. हार्दिकने षटकार मारून सामना संपवला.

भारताकडून विराट कोहलीने 35 धावा, रवींद्र जडेजाने 29 चेंडूत 35 धावा आणि हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने तीन आणि नसीम शाहने दोन गडी बाद केले. भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात 32 धावांची गरज होती आणि भारतीय फलंदाजांनी दोन चेंडू राखून लक्ष्य गाठले.

आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग चौथ्यांदा पराभव केला आहे. यापूर्वी 2016 मध्ये भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला होता. यानंतर 2018 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने पराभव केला. यासह भारताने 2021 च्या पराभवाचा बदला घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT