Shashi Tharoor | Team India Sakal
क्रीडा

India tour of Sri Lanka: शतक करणाऱ्यांनाच दाखवला बाहेरचा रस्ता! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीवर भडकले शशी थरूर

Pranali Kodre

Shashi Tharoor lashed out At Team India Selectors: भारतीय संघ जुलैच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. २७ जुलैपासून चालू होणाऱ्या या दौऱ्यात ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासाठी गुरुवारी (१८ जुलै) भारतीय संघाची निवड करण्यात आली.

दरम्यान, अनेक बदल भारताच्या वनडे आणि टी२० संघात दिसून आले. मात्र, या निवडीवर लोकसभा खासदार आणि क्रिकेटचे चाहते असलेल्या शशी थरूर यांनी खरपूस टीका केली आहे.

त्यांनी संजू सॅमसनला वनडे संघात आणि अभिषेक शर्मा याला टी२० संघात जागा न दिल्यानं टीका केली आहे.

संजू सॅमसनने त्याच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या अखेरच्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली होती, तसेच अभिषेक शर्माने नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेत शतक केले होते. याचीच आठवण शशी थरूर यांनी करून दिली आहे.

त्यांनी ट्वीट केलं की 'या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी झालेली संघ निवड मनोरंजक आहे. संजू सॅमसन, ज्याने त्याच्या शेवटच्या वनडेत शतक केले, त्याला वनडे संघात निवडलेले नाही, तर अभिषेक शर्मा, ज्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत शतक केले, त्याला संधीच मिळालेली नाही.'

'भारतीय संघाकडून मिळवलेले यश निवडकर्त्यांना क्वचितच महत्त्वाचे वाटतात. असो काहीही असेल तरी भारतीय संघाला शुभेच्छा'

शशी थरूर यांना अप्रत्यक्षरित्या निवडकर्ते आयपीएलमधील कामगिरीला महत्त्व देत असल्याचे म्हणायचे असल्याचा कयास व्यक्त होत आहे.

दरम्यान, संजू सॅमसनला श्रीलंकात दौऱ्यासाठी वनडे संघात संधी मिळाली नसली, तरी त्याला टी२० संघात संधी देण्यात आलेली आहे. याशिवाय भारतीय टी२० संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय टी२० निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.

इतकेच नाही, तर शुभमन गिलला वनडे संघाचा नवा उपकर्णधार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. वनडे संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम आहे. तसेच रविंद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनाही संघातून वगळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

वनडे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

टी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT