Shashi Tharoor Team India Playing 11 For IND Vs NZ 2023 ODI World Cup 2023 : 
क्रीडा

Ind vs Nz : शशी थरूरांनी पांड्याची दिली भन्नाट रिप्लेसमेंट, क्रिकेट पंडितांनाही जमलं नसतं असं कॉम्बिनेशन

Kiran Mahanavar

Shashi Tharoor Team India Playing 11 For IND Vs NZ 2023 ODI World Cup 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा पुढील सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता. तो या सामन्यात खेळणार नाही. अशा परिस्थितीत भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होणे निश्चित आहे.

यादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पांड्याची भन्नाट रिप्लेसमेंट दिली. आणि भारताची बेस्ट प्लेइंग 11 सांगितली. त्यांनी शार्दुल ठाकूरला भारतीय संघातून वगळले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना संधी दिली.

शशी थरूर यांनी सामन्यापूर्वी ट्विट करून आपल्या प्लेइंग 11ची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, 'हार्दिक पांड्या रविवारी धर्मशाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या पुढील वर्ल्ड कप सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी खेळण्यासाठी संघात एकही चांगला अष्टपैलू खेळाडू नाही, त्यामुळे भारताला संघात संतुलित करणे आवश्यक आहे.

पुढे शशी थरूर यांनी लिहिले की, भारतीय संघात दोन बदल आवश्यक आहेत. लॉर्ड शार्दुलच्या जागी मोहम्मद शमी संघात घेतला पाहिजे. तर हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिल्या पाहिजे. हा सामना वर्ल्डकप 2023 मधील राऊंड रॉबिन स्टेजमध्ये खरचं कोण अव्वल आहे हे ठरवणारा आहे. आपण आपली सर्वोत्तम प्लेईंग 11 खेळवणे गरजेचे आहे.

शशी थरूर यांच्या मते भारताची प्लेईंग-11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Updates : डहाणूत बहुजन विकास आघाडीला धक्का; बविआच्या उमेदवाराचा भाजप प्रवेश

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

FIR lodged on Vinod Tawde: आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

World Men's Day : असंख्य पुरूषांच्या वाट्याला घुसमट; वेळीच मार्ग न सापडल्यास मानसिक आजारांसह व्यसनाधीनतेची भीती

SCROLL FOR NEXT