Sheldon Jackson Blessed With Baby Boy esakal
क्रीडा

केकेआरच्या ‘या’ क्रिकेटरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन हा दुसऱ्यांदा वडील बनला आहे.

धनश्री ओतारी

भारतीय क्रिकेटमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन हा दुसऱ्यांदा वडील बनला आहे. त्याची पत्नी वरदा जॅक्सन हिने रविवारी (१२ जुलै) सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. स्वत शेल्डनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे ही गोड बातमी दिली आहे. (Sheldon Jackson Blessed With Baby Boy)

शेल्डनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर वडील बनल्याची माहिती दिली. आपल्या नवजात मुलाचा फोटो शेअर करत शेल्डनने चाहत्यांसोबत आपला आनंद व्यक्त केला. चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

३५ वर्षीय शेल्डनला अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळालेली नाही. मात्र, त्याने देशांतर्गत आपली कमालीची खेळी दाखवली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सौराष्ट्र संघाकडून ७९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.

यादरम्यान ५०.३९ च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने ५९४७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १९ शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच अ दर्जाचे ६७ सामने खेळताना त्याने २३४६ धावा काढल्या आहेत. तसेच क्रिकेटच्या या स्वरूपात त्याने ८ शतके आणि १२ अर्धशतकेही केली आहेत.

शेल्डन आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाइट राइडर्सकडून मैदानात उतरतो. आयपीएल २०२२ मध्ये त्यांनी विकेटकीपिंगची कामगिरी चोख बजावली. मात्र, फलंदाजीमध्ये त्याची बॅट शांत राहिली. तो केवळ २३ धावा करुन बाद झाला. त्याच्या या खरब कामगिरीनंतर कर्णधार श्रेयस अय्यरने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT