क्रीडा

Team India : गब्बर तात्या कशाला वाट पाहता? क्रिकेट कारकीर्द संपली! आता घ्या निवृत्ती...

Kiran Mahanavar

Team India Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन 37 वर्षांचा झाला आहे. जुलैमध्ये सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा त्याचे नाव एकदिवसीय संघात नव्हते. एकदिवसीय सामन्यांचा उल्लेख येथे आवश्यक होता, कारण धवन फक्त हा एकमेव फॉरमॅट खेळत होता.

शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून भारताकडून कसोटी आणि टी-20 क्रिकेट खेळत नाहीये. आता एकदिवसीय संघातही त्याची सातत्याने निवड होत नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे धवनने काय करावे, हा स्पष्ट संकेत आहे.

शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल सध्या एकदिवसीय फॉर्मेटमध्ये त्याची जबाबदारी पार पाडत आहेत. याशिवाय भारतीय संघाकडे ईशान किशन, केएल राहुलसारखे इतर पर्याय आहेत जे गरज पडल्यास सलामी देऊ शकतात. शिखर धवनला आगामी आशिया चषक किंवा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संधी द्यायची असती तर तो किमान संघात असता, पण डिसेंबर 2022 पासून तो सातत्याने वनडे संघाबाहेर धावत आहे. त्यानंतर भारतीय संघ आत्तापर्यंत तीन एकदिवसीय मालिका खेळली आहे.

2023 मध्ये टीम इंडियाने श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली आहे, परंतु शिखर धवनच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. त्याचवेळी जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकेसाठी संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही, ज्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांचाही समावेश आहे. त्यामुळे तो यापुढे आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघाच्या योजनांचा भाग नसल्याचा संदेश स्पष्ट झाला आहे.

शिखर धवन 37 वर्षांचा असल्यामुळे त्याला संघात निवडले जात नाही. तथापि त्याच्याकडे आयपीएल 2023 चा हंगाम देखील चांगला होता. त्याने 11 सामन्यांमध्ये 142.91 च्या स्ट्राइक रेटने 373 धावा केल्या. त्याने तीन अर्धशतके झळकावली होती आणि सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 99 होती.

शिखर धवनच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे तर, तो बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळला होता. या दौऱ्यावर तो संघाचा कर्णधार होता, पण एक फलंदाज म्हणून त्याने खूप निराश केले आणि या सामन्यांमध्ये त्याने 7,8,3 धावा केल्या. यानंतर त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आले.

धवन हा बीसीसीआयच्या वार्षिक कराराचा भाग आहे. त्याला सी ग्रेडमध्ये ठेवण्यात आले असले, तरी सध्या त्याला वनडेमध्ये संधी दिली जात नाही.

धवनने 2018 पासून भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही, तर 29 जुलै 2021 पासून तो एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आता टीम इंडियासाठी तो डिसेंबर 2022 पासून एकही सामना खेळलेला नाही. धवनने भारतासाठी 34 कसोटी सामन्यांमध्ये 2315 धावा, 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6793 धावा आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये 1759 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT