shikhar dhawan posted on instagram for his son on his birthday sakal
क्रीडा

Shikhar Dhawan : शिखर धवनला सहन होईना लेकराचा विरह...

सर्वकडून ‘ब्लॉक’; मात्र इंस्टाग्रामवर लिहिली वाढदिवसाची भावनिक पोस्ट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अगदी ९९ या धावसंख्येवर बाद झाला, तरी कोणतेही दुखः न जाहीर करता हसत हसत ड्रेसिंग रूममध्ये परतणारा भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन मात्र मुलाच्या विरहाने दुःखी झालाय. वर्षभरापासून मुलगा झोरावरला पाहूही न शकलेल्या धवनवर मुलाच्या वाढदिवसाला इंस्टाग्रामवर शुभेच्छा देण्याची वेळ आली...

शिखर धवन सध्या भारतीय संघात नसला, तरी तो आयपीएलमध्ये पंजाब संघाचा कर्णधार आहे. त्याची क्रिकेटमधील व्यावसायिक कारकीर्द कायम आहे; पण वैयक्तिक आयुष्यात तो दुःखी असला, तरी तो मैदानावर जाणवू देत नाही.

शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झालेला आहे. मुलगा झोरावरचा ताबा वर्षभरापासून आयेशा हिच्याकडे आहे. शिखरशी मुलाचा कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ नये, यासाठी त्याला सर्व प्रकारच्या सोशल मीडियातून ‘ब्लॉक’ केले आहे.

धवन झोरावरला वैयक्तिकरीत्या भेटला होता, त्याला आता वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला आहे. आता झोरावरला वाढदिवाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामचा आधार घ्यावा लागला. झोरावर सदैव सकारात्मक राहील, हसत राहील, असे तो म्हणतो आणि प्रत्यक्षपणे भेटण्याचा दिवस लवकरच येईल, अशी अपेक्षा करतो.

तुला भेटून एक वर्ष तीन महिने झाले. मला सर्वकडून ब्लॉक करण्यात आलेय. त्यामुळे तुझा जुनाच फोटो पोस्ट करतोय. माझ्या लेकरा, तुला वाढदिसाच्या शुभेच्छा. तुझ्याशी मला थेट संपर्क साधता येत नसला, तरी तो टेलिपथीने मी तुझ्या जवळ आहे. तुझा मला अभिमान आहे. तू चांगल्यारीत्या मोठा होत असशील, यात शंका नाही... अशी हृदयस्पर्शी भावना धवनने व्यक्त केली आहे.

तुला नेहमीच मेसेज करतो...

तुला भेटता येत नसले किंवा तुझ्याशी संपर्क साधता येत नसला, तरी मी जवळपास दररोज तुझ्यासाठी मेसेज लिहितो. तुझी चौकशी करतो, माझीही माहिती देत असतो, पण हा मेसेज मला पाठवता येत नाही... असे लिहिणारा धवन झोरावरला भरभरून शुभेच्छा देऊन आपल्या भावना शब्दबद्ध करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT