Shikhar Dhawan Shardul Thakur esakal
क्रीडा

Shikhar Dhawan : ते 40 वे षटक... कर्णधार धवनने सांगितले भारताच्या हातून सामना कधी निसटला

अनिरुद्ध संकपाळ

Shikhar Dhawan Shardul Thakur : पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताचे 306 धावांचे आव्हान 47 व्या षटकातच पार करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने धडाकेबाज फलंदाजी करत 145 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याला कर्णधार केन विलियम्सनने 94 धावांची नाबाद खेळी करत उत्तम साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 221 धावांची विक्रमी भागीदारी रचली. भारताला 300 पार धावा करून देखील पराभव सहन करावा लागला. याबाबत कर्णधार शिखर धवनने सामन्यानंतर बोलताना सांगितले की आम्ही गोलंदाजीत काही चुका केल्या.

सामना झाल्यानंतर कर्णधार शिखर धवन म्हणाला की, 'आम्हाला वाटले की आम्ही चांगल्या धावा केल्या आहेत. पहिल्या 10 ते 15 षटकात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगले वर्चस्व राखले. हे वेगळे मैदान आहे त्यामुळे त्या प्रमाणे आपल्याला रणनिती आखणे गरजेचे आहे. आज आम्ही टॉम लॅथमला खूप शॉर्ट बॉल टाकले तेथेच त्याने आमच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. विशेषकरून लॅथमने 40 व्या षटकात (शार्दुल ठाकूरने टाकेले) सामना आमच्या हातून खेचला. याचवेळी सामन्याचे चित्र पालटले.'

शिखर धवन ज्या 40 व्या षटकाबद्दल बोलतोय ते षटक शार्दुल ठाकूरने टाकले होते. या षटकात टॉम लॅथमने शार्दुलला 25 धावा चोपल्या (वाईडच्या 2 धावा) होत्या. यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. ज्यावेळी 40 वे षटक सुरू झाले त्यावेळी लॅथम 77 धावांवर खेळत होता. ज्यावेळी शार्दुलचे षटक संपले त्यावेळी लॅथमने 100 धावा पूर्ण केल्या होत्या.

शिखर धवन पुढे म्हणाला की, 'न्यूझीलंडमध्ये खेळताना खूप चांगले वाटते. जर आम्ही सामना जिंकला असता तर अधिक आनंद झाला असता. मात्र हा खेळाचाच एक भाग आहे. संघात अनेक युवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी या सामन्यातून खूप काही शिकरण्यासारखे आहे. गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये आम्हाला अजून सुधारणा करण्याची गरज आहे. याचबरोबर फलंदाजाला त्याच्या क्षमतेनुसार खेळ करण्याची मुभा देऊ नये.'

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

SCROLL FOR NEXT