भारताचा सलामीवीर शिखर धवन नेहमी त्यांच्या खेळामुळे चर्चेत असतो. पण सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. आयशा मुखर्जीसोबतच्या घटस्फोटानंतर धवन पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. या चर्चेवर अखेर धवनने मौन सोडले आहे.(Shikhar Dhawan statement divorce ayesha mukherjee marriage wife)
एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत धवन बोलत होता. यावेळी त्यांने खासगी आयुष्यावर भाष्य केलं.
काय म्हणाला धवन
'मी अपयशी ठरलो कारण कोणताही व्यक्ती निर्णय घेतो तेव्हा अंतिम निर्णय त्याचाच असतो. मला इतरांकडे बोट दाखवायला आवडत नाही. मी अयशस्वी झालो कारण मला त्या क्षेत्राची कल्पना नव्हती.
जर तुम्ही मला 20 वर्षांपूर्वी विचारले असते, तर मला क्रिकेटबद्दलच्या या सर्व गोष्टी माहित नसत्या, ज्याबद्दल मी आज बोलत आहे. हा सर्व अनुभवाचा विषय आहे. आधी एक-दोन वर्षे माणसाबरोबर घालवा, बघा दोन्हीचे गोष्टी जुळतात की नाही.
मला लग्न करायचं आहे तेव्हा...
लग्न हा माझ्यासाठी एखादा सामना आहे. सध्या माझा घटस्फोटाचा खटला सुरू आहे, तो पूर्ण झाल्यावर जेव्हा मला लग्न करायचे आहे. तेव्हा माझी मानसिक तयारी असेल. सर्व गोष्टींची मला कल्पना असेल. तेव्हा मी माझा असा जोडीदार निवडू शकेन की तो मला आयुष्यभर साथ देईल.
जेव्हा मी 26-27 वर्षांचा होतो त्यावेळेस मी क्रिकटे खेळत होतो. या गोष्टीशी माझा काही संबंध नव्हता. जेव्हा मी प्रेमात पडलो तेव्हा मला लाल झेंडे दिसत नव्हते, पण आता मी प्रेमात पडलो तर मला ते लाल झेंडे दिसतात. लाल झेंडे असतील तर मी त्यातून बाहेर पडेन.
लग्न माझ्यासाठी बाउंसर...
'लग्न माझ्यासाठी बाऊन्सर होते. सर्वत्र गोंधळ झाला होता. हरणे सुद्धा आवश्यक आहे, पण पराभव स्वीकारायला शिका. मी चूक केली आणि माणूस चुकांमधूनच शिकतो.
शिखर धवनने ऑक्टोबर २०१२ मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केले. त्यानंतर 2014 मध्ये जोरावरचा जन्म झाला. घटस्फोटानंतर जोरावर सध्या त्याच्या आईसोबत मेलबर्नमध्ये राहतो. धवन आपल्या मुलाला भेटण्यासाठी मेलबर्नला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.