Shoaib Akhtar Melbourne Cricket Ground : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत पाकिस्तानचा वर्ल्डकपमधील पहिला सामना झालेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचा एक फोटो ट्विट केला आहे. त्याचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या एमसीजीवर वर्ल्डकप विजेत्या इंग्लंड आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेतील सामना झाला होता. मात्र अॅशेस टीम एकमेकांना भिडत असताना देखील एमसीजी क्रिकेट ग्राऊंड रिकामे होते. यावरून शोएब अख्तरने ट्विट केले.
ऑस्टेलियाने नुकतेच टी 20 वर्ल्डकपचे विश्वविजेते झालेल्या इंग्लंडविरूद्धची वनडे मालिका 3 - 0 अशी जिंकली. मात्र टी 20 वर्ल्डकपनंतर लगेचच तीन दिवसात सुरू झालेल्या या मालिकेकडे ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चाहत्यांनी पाठ फिरवली. सामन्यावेळी स्टेडियम ओस पडली होती. यावरूनच सध्या सुरू असलेल्या अती क्रिकेटला चाहते कंटाळ्याचे हे लक्षण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अनेक माजी खेळाडूंनी आवाज उठवला असून आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ट्विट करून याकडे लक्ष वेधले.
शोएब अख्तरने ट्विट केले की, 'याकडे खूप गांभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. जबरदस्त झालेला वर्ल्डकप नुकताच संपला. वर्ल्डकप जिंकलेल्या इंग्लंडला अवघ्या तीन दिवसात वनडे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी मैदानात उतरावे लागले. मात्र ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात चाहत्यांनी किती रस दाखवला हे या फोटोवरून दिसते. एका महिन्यापूर्वीच झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात 92 हजार लोकं एमसीजीवर होते.'
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने देखील ओव्हरलॅपिंग सिरीज बद्दल आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, युवा खेळाडूंच्या दृष्टीकोणातून पाहिले तर मला त्यांच्याबद्दल दुःख वाटतं. कारण त्यांना या वयात प्रत्येक क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळायचे असते. क्रिकेट खूप वेगानं बदलत आहे. त्याप्रमाणे आपल्याला आखणी करावी लागणार आहे.'
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.