shoaib bashir 1st wicket debut rohit sharma sakal
क्रीडा

Ind vs Eng : पदार्पणातच मोठी शिकार.... 20 वर्षाच्या खेळाडूनं 'हिटमॅन'ला अलगद अडकवलं, पाहा Video

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून विशाखापट्टणम येथे खेळला जात

Kiran Mahanavar

Shoaib Bashir 1st Wicket Debut Rohit Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात शोएब बशीरला इंग्लंडकडून पदार्पणाची संधी मिळाली.

शोएब बशीरसाठी हा सामना एखाद्या स्वप्नवत पदार्पणापेक्षा कमी नव्हता. कारण त्याने या सामन्यात रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूला आपला बळी बनवले. त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही पहिली विकेट होती. त्याने चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला आऊट केले. या सामन्यात रोहितने 41 चेंडूत 14 धावा केल्या.

18 व्या षटकात 20 वर्षीय फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या चेंडूवर हिटमॅन सहज अडकला. बशीर या सामन्यात पदार्पण करत आहे, त्याचे हे फक्त केवळ चौथे षटक होते. रोहित त्यांच्याविरुद्ध आक्रमक होण्याऐवजी बचावात्मक खेळत होता. आणि त्याचा फायदा इंग्लंडने घेतला. कर्णधार बेन स्टोक्सने रोहितसाठी लेग स्लिप लावली आणि तिथेच रोहितने सोपा झेल दिला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली होती. शोएब बशीरला मालिकेतील पहिल्या सामन्यात पदार्पण करता आले असते, परंतु व्हिसाच्या समस्येमुळे तो पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड संघात सहभागी होऊ शकला नाही.

पण दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बशीर भारतात आला. आता दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. जॅक लीच जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी बशीरला संधी मिळाली.

20 वर्षीय क्रिकेटर शोएब बशीर काउंटी क्रिकेट क्लब सॉमरसेटकडून खेळतो. बशीरचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, पण त्याचे आई-वडील पाकिस्तानी वंशाचे आहेत. शोएब बशीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, जे पाहून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स त्याच्यावर खूप प्रभावित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT