Chess Tournament  sakal
क्रीडा

Chess Tournament : सांगलीच्या श्रेयाची चमकदार कामगिरी! राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पटकावलं विजेतेपद

तेरा वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत श्रेयाने पटकावले विजेतेपद....!

सकाळ वृत्तसेवा

Chess Tournament : तेलंगाना राज्यातील सिकंदराबाद येथे दिनांक ४-१२-२०२३ ते १०-१२-२०२३ दरम्यान झालेल्या ३६ व्या तेरा वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत संखचे श्रेया हिप्परगीने निर्विवाद रित्या यश संपादित करत विजेतेपद पटकावले.

कु. श्रेया गुराप्पा हिप्परगी ही मूळची सांगली जिल्ह्यातील रहवासी असून या आधीही तिने थायलंड, स्पेन, जॉर्जिया व इंडोनेशिया या देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी करून आपल्या देशाची मान उंचावली आहे. ती सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या जत तालुक्यातील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला संख(ता जत) या शाळेची विद्यार्थिनी आहे.

या स्पर्धेत श्रेयाने तेलंगणाची लक्षण्या बारला, श्रीदर्शनी, कृतिका, गोव्याची शेकविरा जनिका, तमिळनाडूची संमती श्री, महाराष्ट्राची निहिरा कौल, केरळाची व या टूर्नामेंटची टॉप सीड असलेली कल्याणी सिरीन, ओडीसाची प्रत्याशा जीना व आंध्र प्रदेशची आमुक्ता गुंताका यांच्यावर मात करत अकरा पैकी साडेनऊ गुण मिळवून विजेतेपद पटकावले.

या कामगिरीमुळे तिची आशियाई, जागतिक, वेस्टर्न एशियन व कॉमनवेल्थ या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रा चेस असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले , सांगली जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चितळे , उपाध्यक्ष कोटी भास्कर , सचिव चंद्रकांत वळवडे , वायचळ , श्रेयाचे कोच अनुप देशमुख व सुमुख गायकवाड , निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था संख चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक यांनी श्रेयाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT