WTC Final 2023 Indian Cricket Team Shreyas Iyer esakal
क्रीडा

Team India : ...म्हणून श्रेयस अय्यरची कारकीर्द संपली! दुखापतीमुळे आशिया कपसह वर्ल्ड कपमध्ये खेळणे कठीण

भारतीय संघात दुखापतग्रस्त खेळाडू पुनरागमनासाठी झगडत आहेत यादरम्यान मोठा धक्का...

Kiran Mahanavar

Team India : भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. भारतीय संघात दुखापतग्रस्त खेळाडू पुनरागमनासाठी झगडत आहेत यादरम्यान मोठा धक्का बसला आहे. एकदिवसीय विश्वचषक वर्षात टीम इंडियासाठी हा धक्का कमी नाही.

मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर अद्याप दुखापतीतून सावरला नाही. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील त्याची उपस्थितीही संशयास्पद असल्याचे वृत्त आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, अय्यर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषकापर्यंत तंदुरुस्त होणार नाही. एप्रिलमध्ये श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये खेळला नाही. आता जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची निवड झालेली नाही.

जर सूत्रांवर विश्वास ठेवला गेला तर, अय्यर आता नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीतुन स्वतःला सावरत आहे. पण पाठीवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरही त्याला त्रास होत आहे. शस्त्रक्रियेच्या वेळी श्रेयस अय्यरचा वर्ल्डकपपर्यंत पुनरागमन करण्याचा विचार होता, परंतु सध्याची परिस्थिती पाहता त्याला आशिया कपमध्येही खेळणे कठीण जात आहे.

मुंबईचा हा दिग्गज खेळाडू 2017 मध्ये पदार्पण केल्यापासून गेल्या काही वर्षांत संघाचा एक महत्त्वाचा सदस्य बनला होता. 2021 मध्ये त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी देखील मिळाली, परंतु वारंवार दुखापतींमुळे तो संघातील आपले स्थान वाचवू शकला नाही. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर 2023 चा संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही.

दरम्यान, सूत्रांनी असेही सांगितले की विश्वचषक स्पर्धेचे बहुप्रतिक्षित वेळापत्रक या आठवड्यातच जाहीर केले जाईल. यजमान शहरांची नावे देण्यात आली आहेत, फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT