Shreyas Iyer Ishan Kishan Fine Batting Performance esakal
क्रीडा

Shreyas Iyer : करो या मरो सामन्यात श्रेयस अय्यरच्या बॅटमधून झळकले शतक

अनिरुद्ध संकपाळ

India Vs South Africa 2nd ODI Shreyas Iyer Ishan Kishan : भारताने दक्षिण आफ्रिकेचे 279 धावांचे आव्हान 7 गडी राखून पार करत मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी साधली. भारताकडून श्रेयस अय्यरने नाबाद शतकी (113) खेळी केली. तर इशान किशनने 84 चेंडूत 93 धावांची आक्रमक खेळी करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 161 धावांची दमदार भागीदारी रचली. गोलंदाजीत मोहम्मद सिराजने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेकडून एडेन माक्ररम 79 तर रीझा हेंड्रिक्सने 74 धावांची खेळी केली. मिलरने 34 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 279 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना भारताचे दोन्ही सलामीवीर 48 धावात माघारी परतले. शिखर धवन 13 तर चांगला खेळत असलेला शुभमन गिल 26 चेंडूत 28 धावा करून बाद झाला.

मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी भारताचा डाव सावरत सावध भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत 21 व्या षटकात भारताचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान, सेट झाल्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी धावगती वाढवण्यास सुरूवात केली.

या दोघांनी अर्धशतके पूर्ण करत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत भारताला 29 व्या षटकात 160 च्या पार पोहचवले. यानंतर इशान किशनने आपला गिअर बदलला. त्याने नॉर्त्जेची चांगलीच धुलाई करत भारताला 31 व्या षटकातच 200 च्या जवळ पोहचवले. दरम्यान, इशान किशन 86 धावांवर असताना रबाडाने स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल सोडून जीवनदान दिले.

आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या इशान किशनने भारताला 34 व्या षटकातच द्विशतकी मजल मारून दिली. मात्र फॉर्च्युनने त्याला 93 धावांवर झेलबाद करत त्याचे शतक पूर्ण होऊ दिले नाही. इशान किशन आणि श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 155 चेंडूत 161 धावांची दमदार भागीदारी रचली.

किशन बाद झल्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी सावध फलंदीज केली. श्रेयस अय्यरने चौकार मारत आपले दुसरे वनडे शतक ठोकले. या शतकाबरोबरच भारत विजयाच्या जवळ पोहचला. अखेर सॅमसन आणि अय्यरने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 278 धावात रोखले. भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेला 50 षटकात 7 बाद 278 धावांपर्यंतच मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 10 षटकात फक्त 57 धावा करता आल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 38 धावात 3 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेकडून एडेन माक्ररम 79 तर रीझा हेंड्रिक्सने 74 धावांची खेळी केली. मिलरने 34 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT