क्रीडा

Team India: 'माझं करिअर संपल्यासारखं...', टीम इंडियात निवड झालेल्यानंतर खेळाडूचा धक्कादायक खुलासा

Kiran Mahanavar

Team India Asia Cup 2023 : भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरला असून तो पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 28 वर्षीय अय्यर सध्या टीम इंडियासोबत अलूरमध्ये आहे. आशिया कपपूर्वी टीम इंडिया येथे सहा दिवसांच्या सराव शिबिरात व्यस्त आहे. शिबिरादरम्यान बीसीसीआयशी विशेष संवाद साधला आणि आपल्या कारकिर्दीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

दुखापतीच्या दिवसांतील त्याच्या संघर्षाची आठवण करून देताना, श्रेयस अय्यर म्हणाला की, खरं तर ही एक स्लिप डिस्क होती आणि वेदना पायापर्यंत जात होत्या. तो एक भयानक काळ होता. आता माझं करिअर संपले आहे असे वाटत होते. हे असह्य वेदना होते आणि मी काय करत आहे हे मला समजत नव्हते. वेदनापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग शस्त्रक्रिया आहे.

श्रेयस अय्यर म्हणाला की, मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो की आता मला ऑपरेशन करावे लागेल, पण ऑपरेशन करणे हा चांगला निर्णय होता आणि मी या निर्णयाने खूश आहे. ऑपरेशननंतर नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये घालवलेले दिवस त्यांच्यासाठी कठीण परीक्षेसारखे होते. फिजिओ आणि ट्रेनरला माझ्या पुनरागमनाची खात्री होती, पण त्यावेळी, मला खात्री नव्हती की मी चाचणी पास होईल की नाही.

आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून अय्यरला आशिया कपमध्ये दमदार पुनरागमन करायचे आहे, परंतु त्याला फार पुढचा विचार करून स्वतःवर दबाव आणायचा नाही आणि वर्तमानात जगायचे आहे. तो म्हणाला, वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आणि माझी दिनचर्या योग्य ठेवणे माझ्यासाठी सध्या महत्त्वाचे आहे. पुढे काय होईल आणि भूतकाळात काय घडले याचा मला विचार करायचा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT