Shreyas Iyer Mumbai Ranji Trophy Team esakal
क्रीडा

Shreyas Iyer : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फ्लॉप गेल्यानंतर श्रेयस अय्यरचे 'बॅक टू बेसिक', इंग्लंड मालिकेपूर्वी...

अनिरुद्ध संकपाळ

Shreyas Iyer Mumbai Ranji Trophy Team : श्रेयस अय्यरसाठी नुकतीच झालेली दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका फारशी चांगली झाली गेली नाही. अय्यरला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. आता भारतात होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरने मोठा निर्णय घेतला. त्याने रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरूवात 25 जानेवारीपासून होणार आहे. यापूर्वी श्रेयस अय्यर मुंबईकडून रणजी सामना खेळणार आहे. अय्यरचा समावेश आंध्र प्रदेश विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात करण्यात आला आहे. हा सामना 12 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत मुंबईत होणार आहे.

मुंबईने यंदाच्या रणजी हंगामाची सुरूवात बिहारविरूद्धच्या सामन्याने केली. मुंबईने दुबळ्या बिहारचा एक डाव आणि 51 धावांनी पराभव करत दणक्यात सुरूवात केली.

श्रेयस अय्यरने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4 डावात फक्त 41 धावा केल्या आहेत. त्याने 13.37 च्या सरासरी धावा केल्या. भारतीय संघाबाबत बोलायचं झालं तर ऋषभ पंत जवळपास फिट झाला असून तो कसोटी संघात परतल्यानंतर अय्यरची थेट स्पर्धा ही केएल राहुलसोबत चौथ्या क्रमांकासाठी होईल.

अय्यरला आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवावी लागले. तरच त्याला कसोटी संघातील आपले स्थान अबाधित राखता येईल. त्यामुळेच त्याने बॅक टू बेसिक जात रणजी सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईचा रणजी संघ :

अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, जय बिस्ता, भुपेन लालवानी, अमोघ भटकळ, सुवेद पारकर, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शम्स मुल्लाणी, तनुष कोटिआन, अथर्व अंकोलकर, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन दिआस, सिल्वेस्टर डिसोझा.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

Pune Crime: पुण्यातील 'त्या' 5 मुलींनी घेतला मोकळा श्वास, पोलिसांची मोठी कारवाई

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT