India vs West Indies, 3rd ODI Shreyas Iyer latest News : वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत टीम इंडियाची आघाडी कोलमडली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन स्वस्तात माघारी फिरले. धडाकेबाज आणि अनुभवी फलंदाज तंबूत परतल्यानंतर युवा फलंदाजांनी संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या जोडीनं शतकी भागीदारी करत संघाची गाडी रुळावर आणली. यादरम्यान श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाचे शतकात रुपांतरित करुन मोक्याच्या क्षणी चौका मारण्याच्या दिशेनं तो वाटचाल करताना दिसतो. त्याची खेळी आयपीएल मेगा लिलावापूर्वीचा (IPL Mega Auction 2022) एक धमाकाच आहे.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या (West Indies) मालिकेपूर्वी ज्या भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती त्यात श्रेयस अय्यरचाही (Shreyas Iyer) समावेश होता. धवनसह तोही कोरोनातून सावरुन तिसऱ्या वनडेत मैदानात उतरले. धवन स्वस्तात बाद झाला. पण श्रेयस अय्यरनं आपल्यातील क्षमता दाखवून देत संघाचा डाव सावरला. कोरोनातून सावरल्यानंतर त्याने टीम इंडियाला सावरले. आगामी हंगामात श्रेयस अय्यर महागडा खेळाडू ठरेल, असा अंदाज आधीपासून वर्तवला जातोय. या खेळीमुळे ही शक्यता आणखी वाढली आहे.
श्रेयस अय्यर शतकाकडे वाटचाल करत असताना हेडन वॉल्शनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. 111 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीने त्याने 80 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याच्याशिवाय रिषभ पंतने 54 चेंडूत 56 धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला 200 धावांचा टप्पा पार करणं शक्य झालं.
आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं श्रेयस अय्यरला रिलीज केेले होते. याआधी श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले. पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेल्यानंतर पंतकडे ही जबाबदारी आली. अय्यर परतल्यानंतही पंतच संघाचा कर्णधार म्हणून कायम राहिला. आता नव्या हंगामात श्रेयस अय्यर एखाद्या फ्रँचायजीचा नेतृत्वाचा चेहरा म्हणून दिसू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्याच्यासाठी मोठी रक्कम खर्च करायला तयार असल्याचे अंदाजही वर्तवण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.