Shubha Satheesh : इंग्लंड सारख्या तगड्या संघाविरूद्ध पदार्पण करण्याची संधी मिळालेल्या शुभा सतीशने आज मोठा धमाका केला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी भारताने 7 बाद 410 धावा ठोकल्या. भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.
मात्र शुभा सतीशने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने भारताकडून महिला कसोटी क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे 24 वर्षाच्या शुभाची ही पदार्पणाची कसोटी आहे. तिने चौकार मारत आपले अर्धशतक 49 चेंडूत पूर्ण केले.
कोण आहे शुभा सतीश?
सुभा सतीश ही कर्नाटक महिला क्रिकेट संघाकडून खेळते. ती मूळची बंगळुरूची असून तिचा जन्म 13 जुलै 1999 ला झाला. ती डावखुरी फलंदाज असून उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी देखील करते.
वुमन्स प्रीमियर लीगमध्ये ती रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून खेळते. 9 डिसेंबरला झालेल्या WPL 2024 लिवात तिला आरसीबीने 10 लाख रूपयात करारबद्ध केलं.
40 चेंडू : संगीता डबीर - भारत विरुद्ध इंग्लंड, 1995
40 चेंडू : व्हेनेसा बोवेन - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, 1998
48 बॉल : नॅट सायव्हर-ब्रंट - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2022
49 चेंडू : शुभा सतीश - भारत विरुद्ध इंग्लंड, २०२३
51 चेंडू : स्मृती मानधना - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२१
57 चेंडू : माईया लुईस - न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 1996
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.