India VS New Zealand 3rd T20 Hardik Pandya  esakal
क्रीडा

IND vs NZ : वेगवान वादळाने किवींचा केला पालापाचोळा; भारताचा इतिहासातील सर्वात मोठा विजय

अनिरुद्ध संकपाळ

India VS New Zealand 3rd T20 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने गुजरातीमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडची अवस्था लिंबूटिंबू टीमसारखी केली. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वादळात सापडलेल्या किवींची फलंदाजी पोलापोचोळ्यासारखी उडून गेली. भारताच्या 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला.

भारताने तिसरा टी 20 सामना विक्रमी 168 धावांनी जिंकत मालिका विजयाची घोडदौड कायम राखली. भारताकडून फलंदाजीत शुभमन गिलने 63 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत हार्दिक पांड्याने 16 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

मायदेशात भारत 'अपराजीत'

- भारताच्या मायदेशातील 25 मालिकांमधील 23 मालिका जिंकल्या आहेत तर 2 मालिका ड्रॉ झाल्या आहेत.

- भारताने गेल्या 4 वर्षात मायदेशात एकही मालिका गमावलेली नाही.

- भारताची 2023 मधील कामगिरी

  • श्रीलंकेला टी 20 मालिकेत 2 - 1 ने केले पराभूत

  • श्रीलंकेला वनडे मालिकेत 3 - 0 ने केले पराभूत

  • न्यूझीलंडला वनडे मालिकेत 3 - 0 ने केले पराभूत

  • न्यूझीलंडला टी 20 मालिकेत 2 - 1 ने केले पराभूत

भारताचे 235 धावांचे भीमकाय आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडसाठी पॉवर प्ले एक वाईट स्वप्नासारखा गेला. किंवींना पहिल्या दोन षटकात दोन धक्के मिळाले. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन एलनला 3 तर दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने डेवॉन कॉन्वेला अवघ्या 1 धावेवर बाद केले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने कॅम्पमनला शुन्यावर बाद करत किवींना तिसरा धक्का दिला.

यानंतर हार्दिक पांड्याने ग्लेन फिलिप्सला 2 धावांवर बाद केले. सूर्यकुमारने सामन्यातील आपला दुसरा जबरदस्त कॅच घेतला. यानंतर हार्दिकने गोलंदाजीत बदल केला. उमरान मलिकने आपल्या पहिल्याच षटकात मायकेल ब्रेसवेलचा 8 धावांवर त्रिफळा उडवत किवींची अवस्था 5 बाद 21 धावा अशी केली.

किवींची पडझड कर्णधार मिचेल सँटनर आणि डॅरेल मिचेल यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कसेबसे न्यूझीलंडचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर शिवम मावीने 9 व्या षटकात सँटनरला 13 तर इश सोधीला शुन्यावर बाद करत अवस्था 7 बाद 53 धावा अशी केली.

यानंतर पांड्याने फर्ग्युसनला शुन्यावर टिपले. टिकनेर देखील पांड्याचा मारा खेळू शकला नाही. तो देखील 1 धाव करून माघारी परतला. त्यानंतर उमरान मलिकने 35 धावा करणाऱ्या मिचेलला बाद करत किवींचा डाव 66 धावात संपुष्टात आणला.

तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 20 षटकात 4 बाद 234 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने नाबाद 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपले पहिले वहिले टी 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. गिलने पूर्ण 20 षटके खेळली. त्याला राहुल त्रिपाठीने 44 तर हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 30 धावा करून चांगली साथ दिली. गिलने भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला. त्याने 63 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT