Shubman Gill Sunil Gavaskar IND vs AUS 3rd Test : बॉर्डर - गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला अखेर अंतिम 11 च्या संघात स्थान मिळाले. केएल राहुलला संघाबाहेर ठेवत राहितने शुभमन गिल सोबत सलामी दिली. गिल देखील मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी जीव तोडून फलंदाजी करत होता.
अशीच एक चोरटी धाव घेण्याच्या नादात त्याला डाईव्ह मारावा लागला आणि त्याच्या कंबरेच्या इथे जखम झाली. यानंतर फिजिओ त्वरित मैदानात आले आणि त्याच्यावर उपचार केले. मात्र हीच गोष्ट भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी रूचली नाही.
त्यांनी शुभमन गिलवर टिका केली. मात्र ही टिका ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर आणि समालोचक मॅथ्यू हेडनला आवडली नाही. यामुळे या दोघांमध्ये यावरून वाद प्रतिवाद देखील झाला.
सुनिल गावसकर समालोचन करताना म्हणाले की, 'गिलला थोड्या उपचारांची गरज लागली. त्याला क्रिजमध्ये पोहचण्यासाठी डाईव्ह मारावा लागला. मात्र मला इथं सांगायचं आहे की तो अजून दोन चेंडू वाट पाहू शकला असता. एक वेगवान गोलंदाज आहे त्याने चार चेंडू टाकले आहेत, उन्हाचा तडाखा आहे. त्यात तुम्ही त्याला विश्रांतीची संधी दिली.'
'तुम्हाला दुखापत झाली आहे मात्र तुम्ही 2 चेंडू वाट पाहू शकला असता. षटक संपल्यानंतर फिजिओला बोलवू शकला असता. तुम्ही तसेही नॉन स्ट्राईकर एन्डलाच होता. तुम्हाला चेंडू खेळायचा देखील नव्हता. या छोट्या छोट्या गोष्टींनी फरक पडतो.'
गावसकरांच्या या वक्तव्यावर हेडनने असहमती दर्शवली. तो म्हणाला, 'सनी तुम्ही खूप कठोर व्यक्ती आहात. हे बोलणं डसलं.' मात्र गावसकरांनी आपला मुद्दा सोडला नाही.
ते म्हणाले की होय तुम्ही देशाकडून खेळताय. फक्त दोन चेंडू शिल्लक होते. तुम्ही नॉन स्ट्राईकरवर होता. जर तुम्हाला चेंडू खेळायचा असता तर मी समजू शकलो असतो की तुम्ही थोडी अडचण जाणवली अशती. मात्र गिलला दोन चेंडू थांबता आलं असतं.'
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.