Shubman Gill : भारताचा तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर शुभमन गिल ऑस्ट्रेलिायविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. शुभमन गिल हा डेंग्यूने आजारी आसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ची सुरूवात काल इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने झाली. यजमान भारत आपली मोहीम रविवारी 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना खेळून करणार आहे.
मात्र या सामन्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूने आजारी पडला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत इशान किशन सलामीला येण्याची शक्यता आहे. शुभमन गिलने 2023 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार गिलला डेंग्यूची लागण झाल्याचे कालच्या सराव सत्रावेळी निष्पन्न झाले. आज भारताचे आज दुसरे सराव सत्र होणार आहे. या सराव सत्राला शुबमन गिल उपस्थित राहणार नाही.
गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आणि राहुल द्रविड इशान किशनलाच सलामीवीर म्हणून खेळवण्याची शक्यता आहे. केएल राहुल हा मधल्या फळीतच खेळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इशान किशन हाच भारतासमोरचा एकमेव पर्याय आहे. इशान किशनने देखील सलामीलाच चांगल्या धावा केल्या आहेत.
इशान किशनने वनडे मधील पहिले शतक हे बांगलादेशविरूद्ध सलामीला खेळतानाच ठोकले होते. सलामीवीर म्हणून इशान किशनने 40 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मधल्या फळीत त्याची सरासरी ही 29 इतकी आहे.
दरम्यान, गिलच्या प्रकृतीबाबत बीसीसीआय आणि वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असणार आहे. तो डेंग्यूमधून कसा रिकव्हर होतो याच्यावर त्यांचे बारीक लक्ष्य असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.