ICC Players of the Month Esakal
क्रीडा

ICC Players of the Month: वर्ल्डकप दरम्यान ICCची मोठी घोषणा! टीम इंडियाच्या 'या' दोन खेळाडूंना मिळालं गिफ्ट

Big announcement of ICC during World Cup! These two players of Team India received a gift.

Kiran Mahanavar

ICC Players of the Month :

भारतात खेळल्या जात असलेल्या वर्ल्डकप 2023 च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने सप्टेंबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

विशेष म्हणजे पुरुष गटातील तीन खेळाडूंपैकी 2 भारतीय आहेत. हे दोन्ही खेळाडू सध्या वर्ल्डकप खेळत असून गेल्या महिन्यात भारताला आशिया कप जिंकून देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.

या वेळी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंमध्ये डेव्हिड मलान, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. मोहम्मद सिराज सप्टेंबरच्या अखेरीस एकदिवसीय क्रमवारीत नंबर 1 बनला आहे. यासोबत आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता.

त्याचबरोबर आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज शुभमन गिल होता. आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केल्यानंतर डेव्हिड मलानला पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

24 वर्षीय शुभमन गिलने या महिन्यात त्याच्या आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये 80 च्या सरासरीने 480 धावा केल्या, ज्यात कोलंबोमध्ये बांगलादेशविरुद्ध शतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅक टू बॅक सामन्यांमध्ये 74 आणि 104 धावा यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर सिराजने सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 11 विकेट घेतल्या. आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने 21 धावांत 6 विकेट घेतल्या. त्यामुळे श्रीलंका 50 धावांवर ऑलआऊट झाली होता आणि भारत आशिया कप जिंकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT