इंडियन प्रीमियर लीगसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल आता आयपीएलच्या आगामी मोसमात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये (MI) गेल्यानंतर गुजरात टायटन्सने हा मोठा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्स हा आयपीएलमधील नवीन संघांपैकी एक आहे. आयपीएल 2024 हा या संघाचा तिसरा हंगाम असणार आहे. आणि शुभमन गिल या संघाचा दुसरा कर्णधार असेल. यापूर्वी गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केली होती. गेल्या दोन हंगामात संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.
हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला पहिल्या आयपीएल हंगामात चॅम्पियन बनवले. तर दुसऱ्या सत्रात म्हणजेच गेल्या वर्षी या संघाला फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता, ज्याच्या कर्णधारपदाखाली गुजरात टायटन्सने खूप काही पाहिले त्या कर्णधाराच्या जागी कर्णधार बनलेल्या गिलवर आयपीएल 2024 मध्ये हा वारसा वाढवण्याचा दबाव स्पष्टपणे असेल.
गिल आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. आणि त्याने ऑरेंज कॅप जिंकली आहे. गिलने 17 सामन्यात 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या. केन विल्यमसनही गुजरात टायटन्सचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत होता, पण भविष्य डोळ्यासमोर ठेवून फ्रँचायझीने या युवा भारतीय खेळाडूला महत्त्व दिले आहे.
24 वर्षीय शुभमन गिलने 2018 साली कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) आयपीएलमध्ये पदार्पण केले. गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 37.70 च्या सरासरीने 2790 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली. आयपीएल 2023 च्या लिलावापूर्वी गिलला गुजरात टायटन्सने 8 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.