Shubman Gill Post Controversy WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात भारतासमोर विजयासाठी 444 धावा ठेवल्या. इंग्लंडमध्ये चौथ्या डावात 444 धावा चेस करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. मात्र भारतीय फलंदाजांनी सुरूवातीपासूनच सकारात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 7 षटकात 41 धावांची सलामी दिली. मात्र शुभमन गिल बोलँडच्या गोलंदाजवर कॅमरून ग्रीनकडे झेल देऊन परतला.
कॅमरून ग्रीनने स्लीपमध्ये घेतलेला हा झेल वादग्रस्त ठरला. चेंडू खाली टेकला आहे का हे पाहण्यासाठी निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. तिसऱ्या पंचांनी शुभमन गिलला बाद ठरवले. मात्र भारताच्या अनेक समालोचकांनी पंचांच्या या निर्णयावर टीका केली. त्यामुळे वाद निर्माण झाला. याचबाबत शुभमन गिलने दिवस संपल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्याने ग्रीनच्या या वादग्रस्त कॅचचा फोटो टाकून अप्रत्यक्षरित्या पंचांवर निशाना साधला.
शुभमन गिलची ही सोशल मीडिया पोस्टची चांगलीच चर्चा झाली. यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षरित्या शुभमन गिलचे कानच उपटले. एएनआयशी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले की, 'आपण या विषयावर वाद निर्माण करू नये. आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय मान्य करायला हवा.'
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी गिलच्या वादग्रस्त कॅचबाबत कॅमरून ग्रीनला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने 'त्या क्षणी मला खात्री होती की मी झेल पकडला आहे. तो पुढे म्हणाला की, 'त्या क्षणी मला हा झेल मी व्यवस्थित पकला आहे. माझ्या मनात त्यावेळी याबाबत कोणतीही शंका नव्हती. मात्र निर्णय तिसरे पंच केटलबोरोघ यांच्याकडे गेला. त्यांनी देखील हा झेल योग्य ठरवला.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.