Cheteshwar Pujara Shubman Gill esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara : शुभमन गिलने व्यक्त केली इच्छा, राहुलनेही दिली परवानगी अन् पुजाराची कारकीर्दच संपली?

अनिरुद्ध संकपाळ

Cheteshwar Pujara Shubman Gill : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरूवात होत आहे. यजमान वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या कोसटीसाठी आपल्या संघात दोन युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यशस्वी जैसवाल आणि इशान किशन यांना प्लेईंग 11 मध्ये संधी दिली आहे. हे दोघेही कसोटी पदार्पण करणार आहेत. (Shubman Gill Will Play 3rd Spot In Test Cricket)

याचबरोबर भारतीय कसोटी संघाने आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठा बदल केला आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी सलामी देणारा शुभमन गिल हा आता कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. हा निर्णय कर्णधार, प्रशिक्षक किंवा संघ व्यवस्थापनाने घेतला नसून तशी इच्छा खुद्द शुभमन गिलने व्यक्त केली आहे. त्यामुळे इन फॉर्म आणि मोठी खेळी करण्यात तरबेज असलेला शुभमन गिलने पुजाराचे पुनरागमन अवघड करून टाकले आहे. (Cheteshwar Pujara Career)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चेतेश्वर पुजाराला फारशी चमक दाखवता आली नाही. पुजाराने काऊन्टी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडून संघात पुनरागमन केले होते. मात्र आता शुभमन गिल हा पुजाराच्या तुलनेत वेगाने खेळी करणारा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार म्हटल्यावर पुजाराच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शुभमन गिल सामन्यापूर्वी म्हणाला की, 'मी भारताच्या अ संघाकडून खेळताना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. त्यामुळे मी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे भारताकडून देखील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली. संघ व्यवस्थापनाने ही विनंती मान्य करून त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूरमध्ये क्षीरसागर-पाटील समर्थकांत बाचाबाची

Traffic Update: पुणे सातारा महामार्गावर अदभुतपुर्व वाहतुक कोंडी; 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

सायराशी लग्नानंतर ए आर रहमानच्या कुटुंबाने केलेली अ‍ॅडजस्टमेन्ट; पत्नीमध्ये आणि आईमध्ये सगळं आलबेल नव्हतं, गायकाने सांगितलेलं सत्य

Sharad Pawar: हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नेत्याला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Shrinivas Pawar: "भाऊ अन् मुलगा यांच्यामध्ये मी शरद पवारांच्या बाजूने..."; श्रीनिवास पवारांचं मत, दादांना धक्का बसणार?

SCROLL FOR NEXT