Sindhu eyeing third consecutive medal Satwik-Chirag gold Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : सिंधूची नजर सलग तिसऱ्या पदकावर; ऑलिंपिक बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागला खुणावतेय दुहेरीतील सुवर्ण

सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला ऑलिंपिकमधील देशाचे पहिले बॅडमिंटन सुवर्णपदक खुणावत आहे. त्याचवेळी पी. व्ही. सिंधू हिची नजर सलग तिसऱ्या ऑलिंपिक पदकावर आहे.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला ऑलिंपिकमधील देशाचे पहिले बॅडमिंटन सुवर्णपदक खुणावत आहे. त्याचवेळी पी. व्ही. सिंधू हिची नजर सलग तिसऱ्या ऑलिंपिक पदकावर आहे.

सिंधूने सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यास ती देशातील महान क्रीडापटूंपैकी एक ठरेल. पॅरिस स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनमधील मोहिमेस शनिवारपासून (ता. २७) सुरुवात होत आहे.

मागील दोन ऑलिंपिक स्पर्धेत सिंधूने अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक जिंकले आहे. आणखी एका पदकासाठी तिला कामगिरी उंचावणारा खेळ करावा लागेल. फ्रान्सच्या राजधानीत यावर्षी सात्विक व चिराग जोडीने सुपर ७५० दर्जाच्या स्पर्धेत पुरुष दुहेरी किताब पटकावला होता, या शहराशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध भारतीय जोडी कायम ठेवण्यास इच्छुक असेल.

एच. एस. प्रणोय व लक्ष्य सेन यांची पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे. ते दोघेही पदकासह मायदेशी परतण्यास इच्छुक असतील, मात्र त्यापैकी फक्त एकटाच पदक जिंकू शकेल. कारण – प्राथमिक फेरीचा टप्पा पार केल्यानंतर प्रणोय व लक्ष्य यांच्यात उपउपांत्यपूर्व फेरीत गाठ पडण्याचे संकेत आहेत.

अश्विनीसाठी तिसरी स्पर्धा महत्त्वाची

भारताची महिला दुहेरीतील अनुभवी खेळाडू अश्विनी पोन्नाप्पा हिच्यासाठी पॅरिस ऑलिंपिक कदाचित शेवटची असेल आणि तिसऱ्याच वेळेस यशस्वी ठरण्याचे तिचे प्रयत्न असतील. नवोदित तनिशा क्रास्टो ऑलिंपिकमध्ये पदार्पण करत असून ती अश्विनीची दुहेरीतील साथीदार आहे.

सात्विक-चिराग जोडी पदकासाठी दावेदार

एकेरीतील खेळाडूंसाठी वाटचाल अडथळ्याची असली, तरी भारताची दुहेरी जोडी पदकासाठी दावेदार असेल. सात्विक-चिराग जोडीने यावर्षी पुरुष दुहेरीत दोन स्पर्धा जिंकल्या असून चार स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे. याशिवाय या जोडीने थॉमस कप जिंकला असून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, तर २०२२ मधील जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले आहे.

शिवाय आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई अजिंक्यपदक स्पर्धेतील सुवर्णपदकही त्यांनी जिंकलेले आहे, तसेच त्यांनी जागतिक क्रमवारी अव्वल स्थानही पटकावले. पॅरिस ऑलिंपिकमध्ये सात्विक-चिराग जोडी तृतीय मानांकित असून क गटात आहे.

या गटात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली ऑल इंग्लंड विजेती फजर अलफियान व मुहम्मद रायन आर्दिन्तो ही इंडोनेशियन जोडी, ३१व्या क्रमांकावरील मार्क लॅम्सफस व मर्विन सीडेल ही जर्मन जोडी, तसेच ४६व्या स्थानावरील लुकास कॉर्व्ही व रोनान लाबाँ ही फ्रेंच जोडी आहे.

सिंधूला खेळ उंचवावा लागेल

सिंधूची पॅरिस ऑलिंपिकपर्यंतची वाटचाल ठिसूळ ठरलेली आहे. यावर्षी फेब्रुवारीत तिने दुखापतीनंतर पुनरागमन केले. मलेशिया मास्टर्समध्ये ती उपविजेती ठरली. हा अपवाद वगळता तिची कामगिरी उल्लेखनीय ठरलेली नाही.

टोकियो ऑलिंपिकमध्ये तिने कोरियन प्रशिक्षक पार्क तेय-सँग यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राँझपदक जिंकले होते. कालांतराने तिने मलेशियन हफिज हशिम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला, त्यानंतर तिने प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत मुक्काम हलविला, तेथे इंडोनेशियन प्रशिक्षक अगुस सांतोसो यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT