smriti mandhana Jabra Fan in Sri Lanka Stadium field second t20 match 
क्रीडा

स्मृतीसाठी जीव झाला यडा पिसा, पेट्रोल नाही तरी आला भेटायला

दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान स्मृती मानधनाचा जबरा फॅन स्टेडियममध्ये आला होता

Kiran Mahanavar

भारतीय महिला आणि श्रीलंका महिला संघामध्ये 3 टी-20 सामन्यांच्या मालिका खेळल्या जात आहे. मालिकेतील दुसरा सामना आज रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळला जात आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाची नजर हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यावर असले. तर श्रीलंकेच्या संघाची नजर आजचा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरी करण्यावर असेल, पण दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान स्मृतीचा एक जबरा फॅन स्टेडियममध्ये आला होता. (smriti mandhana Jabra Fan in Sri Lanka Stadium field second t20 match)

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाचा एक जबरा फॅन प्रेक्षकांमध्ये दिसला. या चाहत्याने त्यांच्या हातामध्ये एक पोस्टर आणले होते. या पोस्टरवर लिहिले होते की, माझ्याकडे पेट्रोल नाही तरीपण आलोय स्मृती मंधाना पाहिला. पोस्टरवर दोन हार्ट देखील आहे, मंधानाच्या या चाहत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने भारतासमोर 126 धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेकडून सलामीवीर विशमी गुणरत्ने आणि चामरी आटापटू यांना 87 धावांची सलामी दिली. या दोघींनी भारतीय गोलंदाजांना 14 व्या षटकापर्यंत एकही यश मिळू दिले नाही. गुणरत्नेने 50 चेंडूत 45 धावांची तर आटापटूने 41 चेंडूत 43 धावांची खेळी केली. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर रेणुका सिंह, राधा यादव, पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT