माऊंट मोनगानुई: भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने पाकिस्तान (India vs Pakistan) विरूद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकून आपले वर्ल्डकप मोहिम धडाक्यात सुरू केली. भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव केला. जरी पाकिस्तानचा संघाचा दारून पराभव झाला असला तरी सामन्यानंतर पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफ (Bismah Maroof) चर्चेत आली होती. ती आपल्या सहा महिन्याच्या बाळासह मैदानात उतरली होती. यामुळे भारताच्या सर्वच खेळाडूंबरोबर स्मृती मानधनाही (Smriti Mandhana) बिसमाह मारूफची फॅन झाली. (Smriti Mandhana Praise Pakistan Women's Captain Bismah Maroof)
भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यानंतर भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकूर, मेघना सिंह आणि रिचा घोष या सर्वांनी पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफच्या भोवती घोळका केला होता. ही गर्दी बिसमाह मारूफच्या कडेवर असलेल्या तिच्या सहा महिन्याच्या बाळासाठी झाली होती. या घटनेबाबत स्मृती मानधना आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून (Instagram Post) लिहिते की, 'बाळाला जन्म दिल्यानंतर सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणे हे खूप प्रेरणादायी आहे. बिसमाह मारूफने जगभरतील महिला खेळाडूंसमोर एक उदाहरण ठेवले आहे.'
स्मृती आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पुढे लिहिते की, 'फातिमाला भारताकडून खूप सारं प्रेम. आशा आहे की ती देखील तुमच्यासारखी हातात बॅट घेईल कारण डावखुरे खेळाडू विशेष असतात.' स्मृती मानधना देखील डावखुरी फलंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.