Sourav Ganguly Birthday Special  esakal
क्रीडा

Sourav Ganguly Birthday : सचिन सुर्यासारखा तळपला, द्रविडने चंद्र होणं स्वीकारलं; गांगुलीने आकाशगंगाच निर्माण केली

सकाळ डिजिटल टीम

गुरूदत्त सोनसुरकर -

Sourav Ganguly Birthday Special : कुणी क्लीन बोल्ड झालं की गोsssल म्हणून ओरडणाऱ्या भोद्र लोकाय बाबू मोशायच्या शहरातून हा मुलगा क्रिकेट कडे कसा वळला ते एक कोडंच आहे. कारण सौरव गांगुली मुळात एक फुटबॉल प्लेयर होता. पण तेंडल्याच्या अजित दादा सारखाच सौरवचा दादा स्नेहाशिष गांगुली जो स्वतः एक क्रिकेटपटू होता त्याने सौरवला क्रिकेटकडे वळवलं. बाकी हे गांगुली कुटुंब कोलकात्याच्या रईसांपैकी. बारा खोल्यांची गढी होती जणू आणि अनेक नोकर. अशा या प्रिन्स ऑफ कोलकाता चं लाडाच नाव महाराजा.

तो म्हणे वागायचा ही तसच. कुठल्या तरी एका ज्युनिअर स्पर्धेच्या टूर वर सुरुवातीच्या काळात राखीव गडी म्हणून त्याने पाणी न्यायला नकार दिला होता. "अशी कामं करायला आमच्या कडे गडी नेमतात." अर्थात त्याच हे बाणेदार उत्तर क्रिकेट मधल्या दादा लोकांना काही पचल नाही. कहर म्हणजे त्याच्या या आडमुठे पणामुळे त्याला महाराजा म्हणून गावसकर सरांपासून सगळे चिडवू लागले.

या महाराजांचं डोकं लगेच ताळ्यावर आल. तो ही एक किस्सा आहे. नवज्योत सिद्धू हा टिपिकल सरदार. १९९६ च्या इंग्लंड दौऱ्यात तत्कालीन कप्तान अझहर बरोबर शेरीच काही तरी वाजलन आणि सरदार फ्लाईट पकडून भारतात ना... (नशीब कुणाचा मुडदा नाय बशिवला... सरदार के नाम पे मर्डर जमा हैं..)

त्यावेळच्या होतकरू तरुण सौरव ला पाचारण करण्यात आलं...(दी वॉल द्रविड आणि सौरव दोघांचं टेस्ट डेब्यू एकत्र झालं) आणि सौरवने आल्या आल्या दणक्यात दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत शतक हाणलं. तरीही त्याचा मार्ग काही सुकर होते नव्हता.

त्यात कोलकात्यात परतल्यावर त्याने बालपणीच प्रेम डोना रॉय बरोबर पळून लग्न केलं...पळून का? तर रॉय आणि गांगुली खानदान एकमेकांचे कट्टर वैरी..म्हणजे फुल बंगाली रोमिओ जुलियेट...

सौरव खरा नजरेत आला १९९७ च्या सहारा कप मध्ये. जी कॅनडाला असायची. भारत पाक सामने...ये धमाल असायची. टोरांटो चं थंड वातावरण...आणि दोन भावांच्या (हिंदोस्ता पाकिस्ता) खुन्नशीची गर्मी... याच टुर्नामेंट मध्ये इंझमामने स्टेडियम मध्ये घुसून एका भारतीय चाहत्याला मारलं होतं...तर त्यावेळचा कप्तान बाप्पा हा आपल्या शाळू सोबत्याला म्हणजे विनोद कांबळीला संधी देण्याच्या प्रयत्नात होता.

१९९६ च्या वर्ल्ड कप फायनल नंतर कांबळीने चिडून लय राडा केला होता म्हणे...म्हणून तो फारसा कुणाला नको होता.. पण कांबळीच नशीब पांडू...नाही चालला आणि तेंडल्याला सौरवला घ्यायला लागलं संघात...and boy सौरव गांगुलीने पाकड्यांचे छक्के छूडा दिये... त्याची स्विंग गोलंदाजी इतकी प्रभावी ठरली की त्याला दी मॅन विथ अ गोल्डन आर्म असं नाव पडलं... त्यानंतर मग त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही...

सचिन सुर्यासारखा तळपत असताना द्रविडने चंद्र होणं स्वीकारलं. पण गांगुलीने स्वतः ची आकाशगंगा निर्माण केली. मवाळ सचिनकडून गांगुलीकडे कप्तान शीप आली आणि हळूहळू भारतीय संघ कात टाकायला लागला. सौरव आणि सचिन ही भारताची जोडगोळी जगातली एक उत्तम ओपनिंग जोडी म्हणून गणली जाऊ लागली. आणि दोघांपैकी एक बॉम्ब वाजायचाच.

सौरव हा ऑफ साईड चा महाराजा नाही तर सम्राट होता. दृष्ट काढावी असले सुंदर फटके असायचे त्याचे. क्षेत्ररक्षकांनी फक्त पहात बसावं. "आफ्टर गॉड देअर इज सौरव ऑन दी ऑफ साईड..." - खुद्द राहुल द्रविड म्हणालाय हे.

सर्वात नेत्रदीपक म्हणजे तो डान्सिंग डाऊन दी विकेट यायचा आणि... अहाहा! असले उंच शॉट्स खेळायचा... पक्का सिक्सर!

बेस्ट म्हणजे सौरव कधीही सचिनचं दडपण घ्यायचा नाही.. वो अपना गेम खेलता हैं मैं अपना अशी त्याची साधी प्रणाली होती... हा उर्मटपणा होता का? असेल महाराजा असल्याने फारसा नम्र पणा सौरवला माहीत नव्हता.

सुनील गावसकर सरांसरखा तो ही टोनी ग्रेग वगैरेची उतरवत असे. उद्धटपणा त्याला आता आता शोभू लागला होता. खुन्नस हे खेळ जिंकायचं इंधन आहे हे त्याने भारतीय खेळाडूंना शिकवलं. युवी, भजी, झहीर सगळे त्याचे शिष्य... लॉर्डस वर साहेबाचे लय रुल्स फॉलो करावे लागतात. गावसकर बंड म्हणून लुंगीवर फिरले होते...

सौरवने शर्ट काढून गरागरा फिरवला...लाईक अ रिअल दादा... याला म्हणतात खरी दादागिरी....

आणि ती फक्त या रॉयल बेंगाल टायगर ने दाखवावी...

एक टीम मे सिर्फ एक गुंडा हो सकता है..

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT