दिल्लीतील अरुण जेटलीच्या मैदानावर सोमवारी असे काही घडले जे 146 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात कधीही घडल नव्हत. 409 सामने (कसोटी, एकदिवसीय, टी-20) खेळलेल्या अँजेलो मॅथ्यूजला 15 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो पहिल्यांदा टाईम आऊट झाला. पण १६ वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवरही अशी वेळ आली पण... काय घडलं होतं नेमकं? जाणून घेऊया तो किस्सा...
24.2 षटकांत सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज मैदानात आला. त्यावेळी श्रीलंकेची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 135 धावा होती. शाकिब गोलंदाजीवर होता. मॅथ्यूजही क्रीजवर आला, पण त्याने स्ट्राईक घेतला नाही. त्याने हेल्मेटचा पट्टा जुळवायला सुरुवात केली. स्ट्राइक न घेता, त्याने पॅव्हेलियनच्या दिशेने दुसरे हेल्मेट आणण्याचा इशारा केला.
राखीव खेळाडू हेल्मेट घेऊन मैदानात येत होता. त्यावेळी गोलंदाज असलेला शकिब अल हसनने पंचांकडे अपील केले आणि पंचांनी ते ग्राह्य धरून टाइम आऊटच्या नियमाने मॅथ्यूजला बाद केले. मैदानातून बाहेर पडताच मॅथ्यूजने रागाच्या भरात हेल्मेट फेकले. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसनेही श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरासिंघे यांच्याकडे आपला विरोध व्यक्त केला.
आयसीसी नियम 40.1.1 नुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर पुढील दोन मिनिटांत पुढील फलंदाजाने चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. जर वेळ पूर्ण झाली आणि फलंदाज खेळला नाही तर बाद होतो. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियमांनुसार टाइम आउटची वेळ मर्यादा तीन मिनिटे असली तरी, वर्ल्ड कपमधील ICC नियमांनुसार ती दोन मिनिटे आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मथ्यूज टाइम आऊट या नियमाचा पहिला बळी ठरला असला, तरी अशी वेळ भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर १६ वर्षांपूर्वी आली होती, परंतु आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार ग्रॅहम स्मिथ याने अपीलही केले नव्हते. २००६-०७ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात न्यूलँडस् येथे कसोटी सामना होता.
भारताच्या दुसऱ्या डावात हे नाट्य घडले... भारताचे दोन फलंदाज झटपट बाद झाले. सचिन चौथ्या क्रमांकाचा फलंदाज असल्यामुळे तो मैदानात येत होता, पण त्याअगोदर क्षेत्ररक्षण करत असताना सचिन १८ मिनिटे मैदानाबाहेर होता. नियमानुसार सचिन भारताचा डाव सुरू झाल्यावर १८ मिनिटांच्या आत फलंदाजीस येऊ शकत नव्हता. परिणामी सचिननंतर फलंदाजीचा क्रमांक असलेल्या सौरव गांगुलीला तयारी करण्यासाठी अचानक घाई करावी लागली. यात सहा मिनिटे वाया गेली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.