Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली लढत ही आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला श्रीलंकेत होणार आहे. मात्र या दिवशी पावसाची शक्यता असल्याने हा सामना होणार की नाही यााबबत शंका उपस्थित केली जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यानंतर वनडे वर्ल्डकपमध्ये 14 ऑक्टोबरला एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याबद्दल भारताचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
सौरव गांगुलीने रेवस्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'भारत आणि पाकिस्तान हा खूप मोठा सामना आहे. तो यापूर्वीही मोठा सामना होता आणि यानंतरही मोठा सामना राहणार आहे. तुम्ही वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून त्याचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे. मी या सामन्याकडे भारत - ऑस्ट्रेलिया आणि भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यासारखंच पाहायचो.'
सौरव पुढे म्हणाला की, 'हा एक नक्कीच सामान्य सामना नाही. तुम्हाला या सामन्यासाठी तयार रहायला हवं. तुम्ही त्याचप्रकारे दबाव हाताळू शकता. काहींना दबाव हाताळता येतो काहींना येत नाही. माझ्या कारकिर्दीत आमचं पाकिस्तानविरूद्धचं रेकॉर्ड चांगलं आहे. मात्र यावेळी सामना खूप स्पर्धात्मक होणार आहे.'
'गेल्या वर्षी दुबईत पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर गोष्टी बदलल्या आहेत. पाकिस्तान हा देखील खूप चांगला संघ आहे. त्यांच्याकडेही दर्जेदार खेळाडू आहेत. मात्र भारतात भारताविरूद्ध खेळणे, भारतासोबत अहमदाबादमध्ये खेळणे, तेही 110000 चाहत्यांसमोर ही खूप कठिण गोष्ट आहे.'
सौरव गांगुलीने आपल्या आधीच्या भारत सर्व फायनल जिंकू शकत नाही या वक्तव्यावर देखील स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला, 'भारत कायम फायलन जिंकू शकत नाही असं म्हणण्यामागे माझा उद्येश हा तुम्ही सगळे फायनल सामने जिंकू शकत नाही असा होता. तुम्हाला फायलन खेळण्यासाठी आधी फायनल गाठावी लागले. त्यासाठी तुम्हाला आधी चांगलं खेळावं लागेल. फायनल गाठण्यासाठी 9 सामन्यापैकी बहुतेक सामने जिंकावे लागतील.'
'स्पर्धेच्या सुरूवातीलाच तुम्ही फायनलचा विचार करू नका. हे फलंदाजीसारखं आहे. तुम्ही फलंदाजीला गेला तर पहिल्यांदाच शतकाचा विचार करत नाही. तुम्ही अर्धशतक करता मग 60, 70 धावा करता आणि त्यानंतर 90 मध्ये पोहचला की तुम्ही शतकाचा विचार करता. वर्ल्डकपसाठी देखील सारखंच आहे. पहिल्यांदाच चांगलं खेळा आणि मग फायनलचा विचार करा. ज्यावेळी तुम्ही फायनलमध्ये पोहचाल त्याचवेळी फायनलसाठी योजना आखा आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करा.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.