भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सध्याच्या खेळाडूंच्या पगारासंदर्भात मोठं वक्तव्य केल आहे. सध्याच्या खेळाडूंपेक्षा कुंबळे, द्रविड, गावस्कर यांनी कमी पैसे कमवले खेळ चांगला दाखवला असे विधान गांगुलीने केले आहे. त्याच्या या विधानामुळे क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ माजली आहे.
आयपीएलचे मीडिया हक्क विकल्यानंतर गांगुलीने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. परफॉर्मन्सशी पैसा जोडला जाऊ शकत नाही. सुनील गावसकर ते अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांच्या काळापासून आज खेळाडू जे काही कमावत आहेत, त्यांना पैसा महत्त्वाचा नव्हता. पण त्या सर्वांना परफॉर्म करण्याची भूक होती.
खेळाडू केवळ पैशासाठी खेळत नाही, तर तो त्याच्या पातळीवर खेळतो आणि भारताचे प्रतिनिधित्व केल्याचा त्याला अभिमान वाटतो. असे मत गांगुलीने यावेळी व्यक्त केले.
असे का म्हणाला गांगुली
आयपीएल(IPL) २०२३ ते आयपीएल २०२७ पर्यंत मंगळवारी अखेर बीसीसीआयने(bcci) स्पर्धेचे मीडिया अधिकार(media rights) विकले. मात्र यावेळच्या कमाईच्या आकड्यांने साऱ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. बीसीसीआयने हे मीडिया अधिकार तबल्ल ४८,३९० कोटी रूपयांना विकले आहेत. यातून होणाऱ्या कमाईचे विविध पैलू आणि आकडेवारी समोर आल्यानंतर सारेच हैराण झालेत.
क्रिकेट जगतात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, इतक्या पैशामुळे खेळाडूंच्या खेळावर परिणाम होईल, असे समीक्षकांचे मत आहे. खेळाडू आता पैशासाठी खेळतील. कारण आता खेळाडूंवर पूर्वीपेक्षा जास्त पैशांचा पाऊस पडणार असल्याचे क्रिकेट वर्तुळात मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.