Sourav Ganguly Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने WTC Final च्या दोन्ही डावात चांगली फलंदाजी करत आपले पुनरागमन दणक्यात साजरे केले. यानंतर निवडसमितीने देखील त्याला त्याची कसोटीचे उपकर्णधारपद परत देऊन बक्षिसी दिली. मात्र यावर आता क्रिकेट वर्तुळातून टीका होत आहे. बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.
सौरव गांगुलीने लंडनमधून पीटीआयशी बोलताना म्हणाला की, रहाणेऐवजी शुभन गिलसारख्या नव्या खेळाडूला रोहितचा उत्तराधिकारी म्हणून तयार करणे योग्य ठरले असते.
गांगुली म्हणाला की, 'मी निवडसमितीने पाऊल मागे घेतले असे म्हणणार नाही. मात्र एकजण 18 महिने संघाबाहेर होता. त्यानंतर तुम्ही त्याला एका कसोटीत खेळवलं आणि त्याला पुन्हा उपकर्णधार केलं. मला यामागचा विचारच कळला नाही. तुमच्याकडे रविंद्र जडेजा देखील आहे तो अनेक वर्षापासून कसोटी खेळतोय. तो देखील या पदासाठीचा उमेदवार होता.'
'कसोटी संघात पुनरागमन केल्या केल्या थेट त्याला उपकर्णधार करणे हे मला काही समजले नाही. मला इतकंच म्हणायचं आहे की निवड ही अशी अचानक होऊ नये. त्यात काही सातत्य असलं पाहिजे.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.