World Cup Team India Squad Sourav Ganguly : भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप 2023 सुरू होत आहे. भारत वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. वर्ल्डकपसाठी भारतीय निवडसमितीने अजून आपल्या संघाची घोषणा केलेली नाही. मात्र आता भारताचे माजी दिग्गज खेळाडू आपापली टीम निवडत आहेत.
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील वर्ल्डकपसाठी आपला 15 खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघात सौरव गांगुलीने तरूण खेळाडू तिलक वर्माला संधी दिली नसून त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवची संघात वर्णी लागली आहे. याचबरोबर फिरकीपटू निवडताना सौरव गांगुलीने युझवेंद्र चहलच्या ऐवजी कुलदीप यादवलाच जास्त महत्व दिलं आहे.
सौरव गांगुलीने आपल्या 15 जणांच्या संघात विकेटकिपर बॅट्समन म्हणून केएल राहुलची निवड केली आहे. याचबरोबर संघात इशान किशनचा देखील समावेश करण्यात आला आहे. सौरव गांगुलीने स्टार स्पोर्ट्सवर भारताचा 15 जणांचा वर्ल्डकप संघ जाहीर केला.
या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन यांची निवड करण्यात आली आहे. तर मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. वनडेमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारला सौरव गांगुलीने संघात स्थान दिले आहे. मात्र पदार्पणातच धमाका करणाऱ्या तिलक वर्माकडे त्याने दुर्लक्ष केले.
सौरव गांगुलीने आपल्या संघात वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून दोन खेळाडूंची निवड केली आहे. त्याने हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांची निवड केली आहे. शार्दुल ठाकूर गोलंदाजीसोबतच तळात उपयुक्त फलंदाजी देखील करतो.
गांगुलीने फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची निवड केली. तर फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहल ऐवजी गांगुलीने कुलदीप यादवला पहिली पसंती दिली आहे. त्याने वेस्ट इंडीजविरूद्धच्या वनडे मालिकेत दमदार गोलंदाजी केली होती. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले आहे.
वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलीने निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.