sourav ganguly virat kohli rohit sharma 
क्रीडा

Team India: 'रोहित-कोहली अजूनही...' सौरव गांगुली BCCI च्या निवडी समितीवर भडकले

Kiran Mahanavar

Sourav Ganguly on Virat Kohli Rohit Sharma : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंना 2022 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 10 गडी राखून पराभव पत्करावा लागल्यापासून भारताच्या टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली दोघांची टीममध्ये निवड केली जात नाही.

नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. भविष्यात त्याला मर्यादित षटकांचे कर्णधारपद मिळू शकते. दरम्यान बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टी-20 संघातील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गांगुलीच्या मते, हे दोन्ही दिग्गज खेळाडू अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी योगदान देऊ शकतात.

सौरव गांगुली काय म्हणाला?

गांगुली एका मुलाखतीत म्हणाला, “तुमचे सर्वोत्तम खेळाडू निवडा, ते कोण आहेत याने काही फरक पडत नाही. माझ्या मते विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचेही टी-20 क्रिकेटमध्ये त्यांचे स्थान अजूनही आहे. कोहली किंवा रोहित टी-20 क्रिकेट का खेळू शकत नाहीत हे मला समजत नाही. आयपीएलमध्ये कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये होता. तुम्ही मला विचाराल तर दोघांचेही टी-20 क्रिकेटमध्ये स्थान आहे.

कोहली आणि रोहित यांची वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या 20I मालिकेसाठीही निवड झालेली नाही.

विशेष म्हणजे, त्यांच्या टी-20 भविष्याबाबत बोर्ड किंवा खेळाडूंकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. रोहित आयपीएलमध्ये अपेक्षा पूर्ण करू शकला नाही, तर कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. मोसमातील सर्वाधिक धावा करणारा तो चौथा होता. त्याने 14 सामन्यात 639 धावा केल्या. रोहितने 16 सामन्यात केवळ 332 धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो 28 व्या क्रमांकावर होता.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर 2 कसोटी सामने, 3 वनडे आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. रिंकू सिंगला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळाली नसून तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल या युवा खेळाडूंना आपली जागा निश्चित करता आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT