India tour of South Africa : भारताविरुद्ध 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20, कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. सोमवारी दक्षिण आफ्रिकेने तिन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केला.
कर्णधार टेंबा बावुमाला मर्यादित षटकांच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. मात्र, तो कसोटी मालिकेत पुनरागमन करणार आहे. टेंबा बावुमा टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नसल्यामुळे एडन मार्करामला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर बावुमा कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आधीच तीन संघ जाहीर केले आहेत. या दौऱ्यात टीम इंडियाचे 3 वेगवेगळे कर्णधार असतील. सूर्यकुमार टी20 मालिकेत तर केएल राहुल वनडेमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. त्याचबरोबर रोहित शर्मा कसोटी मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. दोन्ही फलंदाज केवळ कसोटी मालिकेत खेळणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ : एडन मार्कराम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रेटकजे, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरिया, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेन्सन, हेन्रिक. क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझार्ड विल्यम्स
दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ : एडन मार्कराम (कर्णधार), बार्टमॅन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्गी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रस्सी, रस्सी वेरेयन, लिझाद विल्यम्स
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डीजॉर्गी, डीन एल्गर, मार्को जेन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो स्टेब्स, ट्रायब्स, ट्रायब्स काइल व्हेरीन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.