South Africa vs India 1st Test Day 1 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (SA vs IND) यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. लोकश राहुल आणि मयांक अग्रवाल जोडीने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केलीये. अजिंक्य रहाणेला परदेशातील कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे गोलंदाजीमध्ये शार्दुल ठाकुरचाही समावेश करण्यात आलाय.
भारतीय प्लेइंग इलेव्हन : लोकेश राहुल ( KL Rahul ) मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), विराट कोहली Virat Kohli (c) , रिषभ पंत (Rishabh Pant (wk) ,रविंचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) , शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) , मोहम्मद शमी (Mohammed Shami) , जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) , मोहम्मद सिराज Mohammed Siraj
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ तीन कसोटी मालिकेसह तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासह दक्षिण आफ्रिका संघाला मोठा दणका बसला होता. सलामीवीर रोहित शर्मा आणि कसोटी संघाचा उप- कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघातील जलदगती गोलंदाज नॉर्तजेनंही कसोटीतून माघार घेतली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलवर मोठी जबाबदारी असणार आहे.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : डिन एल्गर (Dean Elgar (c), एडन मार्करम (Aiden Markram), पीटरसेन (Keegan Petersen), रस्सी व्हॅन डर दुसेन (Rassie van der Dussen), तेम्बा बव्हुमा (Temba Bavuma), क्विंटन डिकॉक (Quinton de Kock (wk), विआन मुलडेर (Wiaan Mulder), मार्को जेसन (Marco Jansen), केशव महाराज (Keshav Maharaj), कागिसो रबाडा (Kagiso Rabada०, लुंगी एनिग्डी (Lungi Ngidi).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.