South African cricketer Devilliers to come back in upcoming t 20 world cup 
क्रीडा

#ABDevilliers:डिव्हिलिअर्सच्या चाहत्यांना गुड न्यूज; 'या' स्पर्धेत करणार 'कम बॅक'

सकाळ डिजिटल टीम

सेंच्युरियन (दक्षिण अफ्रिका) Cricket : चौफेर फटकेबाजीनं जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या दक्षिण अफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सनं  A B Devilliersअचानक रिटायरमेंटची घोषणा केल्यानं, क्रिकेटप्रेमींची निराशा झाली होती. पण, आज त्याच्या 36व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या चाहत्यांना एक गुडन्यूज मिळलीय. डिव्हिलिअर्स पुन्हा दक्षिण अफ्रिकेच्या टीममधून खेळण्याची शक्यता निर्माण झालीय. अफ्रिकेचे कोच मार्क बाउचर यांनीच डिव्हिलिअर्सच्या कम बॅकला दुजोरा दिलीय.

दक्षिण अफ्रिकेच्या संघाला इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचमध्या पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुळात गेल्या वर्षी झालेल्या इंग्डमधील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये अफ्रिकेचा परफॉर्मन्स अतिशय खालावला होता. त्याचवेळी डिव्हिलिअर्सच्या कमबॅकची चर्चा झाली होती. त्यावेळी डिव्हिलिअर्सनच टीममध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, अफ्रिकेच्या क्रिकेट बोर्टानं त्यावेळी नकार दिला होता. आता मात्र, अफ्रिकेचे कोच मार्क बाउचर यांनीच त्याच्या कमबॅकला दुजोरा दिला आहे. या वर्षा अखेरीस, ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होत आहे. या त्या वर्ल्ड कपमध्ये अफ्रिकेची टीम जोमानं उतरण्याची तयारी करत आहे. त्या टीममध्ये डिव्हिलिअर्सचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याचा आतापासूनच संघात समावेश होण्याची शक्यता आहे. 

डिव्हिलिअर्सच्या कम बॅकविषयी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे. पण, माझ्यासाठी हा चर्चेचा विषय नाही. या संदर्भात माझी आणि त्याची चर्चा झाली आहे. लवकरच त्याबाबत काय निर्णय होणार आहे, हे स्पष्ट होईल. जर, आम्ही वर्ल्ड कप खेळणार असू तर, आम्हाला टीममध्ये बेस्ट प्लेअर्स हवे आहेत. 
- मार्क बाउचर, कोच, दक्षिण अफ्रिका 

स्पोर्ट्सच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

वर्ल्ड कपमध्ये झाले असते कम बॅक
डिव्हिलिअर्सला यापूर्वी बिग बॅश लिगमध्ये शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्या सिरीजमध्ये पहिली मॅच खेळल्यानंतरच त्यानं आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफ्रिकेकडून खेळण्याची इच्छा असल्याचं जाहीर केलं होतं. बाउचरनं 23 मे 2018 ला अचानक रिटायरमेंटची घोषणा केली होती. त्यावेळी त्याच्या निर्णयानं अफ्रिकेतील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला होता. 2019च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये त्यानं खेळावं, अशी सगळ्यांची इच्छा होती. वर्ल्ड कपच्या तोंडावर त्यानंही ती इच्छा व्यक्त केली. परंतु, अफ्रिका क्रिकेट बोर्डानं त्याची विनंती मान्य केली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : विकासकामे न करणाऱ्यांकडूनच टीका : शंभूराज देसाई; सुपने येथे प्रचार सभा, टीका न करता कामे करत राहण्याचा निर्वाळा

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

SCROLL FOR NEXT