FIFA Women's World Cup 2023 esakal
क्रीडा

FIFA Women's World Cup 2023 : स्पेनने इंग्लंडचा इतिहास रचला; फिफा महिला वर्ल्डकपला मिळाला नवा विजेता

अनिरुद्ध संकपाळ

FIFA Women's World Cup 2023 : स्पेन आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या फिफा महिला वर्ल्डकप 2023 च्या फायनलमध्ये स्पेननचे इंग्लंडचा 1 - 0 असा पराभव करत इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. स्पेनकडून ओल्गा कारमोनाने 29 व्या मिनिटाला गोल केला. सामन्यात हा एकमेव गोल झाला. (Spain Defeat England By 1 - 0)

विशेष म्हणजे स्पेन आणि इंग्लंड हे दोन युरोपियन देश फिफा महिला वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकले होते. इतर स्पर्धांमध्ये इंग्लंड आणि स्पेन महिला फुटबॉल स्पर्धेत 13 वेळा आमने सामने आले आहेत. त्यातील फक्त दोन सामन्यातच इंग्लंडचा पराभव झाला होता. मात्र वर्ल्डकपमध्ये स्पेनने इंग्लंडचे पारडे जड असतानाही त्यांना मात दिली.

यंदा फिफा महिला फिफा वर्ल्डकपला नवा विजेता मिळाला आहे. स्पेन हा फिफा महिला वर्ल्डकपचा पाचवा विजेता ठरला आहे. यापूर्वी युएसएने 4, जर्मनीने 2 तर नॉर्वे आणि जपान यांनी प्रत्येकी 1 वेळा वर्ल्डकप जिंकला आहे.

सामन्याबद्दल बोलायंच झालं तर दोन्ही संघांनी सुरूवातीपासून आक्रमक खेळ करत गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र 29 व्या मिनिटाला स्पेनची कर्णधार ओल्गाने डाव्या बाजूने इंग्लंडच्या गोलंपोस्टवर जोरदार चढाई केली. कर्णधाराने मिळालेल्या संधीचं सोनं करत इंग्लंडवर पहिला गोल केला.

यानंतर इंग्लंडने हा गोल फोडण्यासाठी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पेनच्या बचाव फळीने आपली गोलपोस्ट भेदू दिली नाही. पहिल्या हाफमध्ये स्पेनने इंग्लंडवर 1 - 0 अशी आघाडी घेतली होती.

दरम्यान, स्पेनला 66 व्या मिनिटाला पेनाल्टी मिळाली होती. मात्र या पेनाल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून आपली आघाडी 2 - 0 अशी करण्याची संधी स्पेनने गमावली. जेनिफर हेरमोसोला गोल करण्यात अपयश आले.

दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडने गोलची परतफेड करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पेनने सामन्यावरील आपली पकड अजून मजबूत करत इंग्लंडला संधी दिली नाही. 15 मिनिटाच्या एक्स्ट्रा टाईममध्येही इंग्लंडला गोल करण्यात यश आले नाही. इंग्लंडने संपूर्ण सामन्यात स्पेनच्या गोलपोस्टवर 8 वेळा चढाई केली. मात्र त्यातील फक्त 3 शॉट्सच ऑन टार्गेट होते.

दुसऱ्या बाजूला स्पेनने इंग्लंडच्या गोलपोस्टच्या दिशेने 13 फटके मारले. त्यातील 5 फटके हे ऑन टार्गेट राहिले. बॉलवर नियंत्रण आणि पासेसेच्या बाबतीत स्पेनने इंग्लंडपेक्षा सरस खेळ केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT