Spanish FA President Kiss Video  esakal
क्रीडा

Spanish FA President Kiss Video : वर्ल्ड कप जिंकल्याच्या आनंदात अध्यक्षांचं सुटलं भान, थेट खेळाडूलाच केलं 'KISS'!

युगंधर ताजणे

Spanish FA President Kiss Video : स्पेनच्या त्या फुटबॉलच्या संघटनेचे अध्यक्ष आता हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यांनी आपल्याच देशाच्या एका महिला खेळाडूला किस केलं आहे.

त्याचे झाले असे की, रविवारी स्पेननं फुटबॉलच्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये विजय मिळवला. त्याचा आनंद साऱ्या देशानं मोठ्या प्रमाणात साजरा केला. स्पेन हा विश्वविजेता झाला. कार्मोनानं २९ व्या मिनिचाला गोल करुन इंग्लंडला पराभूत केले. या मॅचच्या दरम्यान जे काही घडले ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

मॅचच्या दरम्यान स्पेनच्या फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष ल्यूक रुबियालेसही तिथं हजर होते. त्यावेळी त्यांनी आपला संघ जिंकल्याच्या आनंदात संघाच्या एका महिला खेळाडूला किस केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले आहे. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संघटनेच्या अध्यक्षांवर जोरदार टीका होत आहे.

फायनल संपल्यानंतर एक एक खेळाडू मेडलचा स्विकार करण्यासाठी स्टेजवर येत होते. त्यावेळी ल्यूक तिथं हजर होते. ते प्रत्येकाला शुभेच्छाही देत होते. जेव्हा स्पेनची स्ट्रायकर जेनी हरमोसो मेडल घेण्यासाठी स्टेजवर गेली तेव्हा ल्यूक यांनी तिची गळाभेट घेतली. आणि तिला किस केलं. जेनी त्या घटनेनं भांबावून गेली. तिला मोठा धक्काच बसला.

जेनीनं त्या प्रसंगानंतर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. जेव्हा तिची एका टीव्ही चॅनेलनं मुलाखत घेतली तेव्हा त्यात तिनं या गोष्टीविषयी खुलासा केला. तिनं ल्यूकच्या त्या हरकतीबाबत राग व्यक्त केला. मात्र त्याचवेळी त्यांचा बचावही केला. सोशल मीडियावर ल्यूकवर प्रचंड रागानं प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT