भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) ने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 67 प्रशिक्षण शिबिर स्थगित केली आहेत. साईने अधिकृत निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशभरातील 67 प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आली आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत आम्ही हा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातील प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरु केली जातील, असा उल्लेखही त्यांनी निवेदनात केलाय. (Sports Authority Of India To Shut Down 67 Training Centres Amid Rising COVID-19 Cases)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी देशात 1.79 लाख नवे कोरोना रुग्ण (Covid 19 Case) आढळले आहेत. या आकडेवारीसह देशातील कोरोनाची संख्या 7.23 लाखावर गेली आहे. मागील 204 दिवसात रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. कोरोनामुळे 146 लोकांनी आपला जीव गमावला असून देशातील मृत्यांचा आकडा 4.83 लाखांवर पोहचला आहे.
अनेक स्पर्धा आधीच रद्द
देशातील कोरोनाच्या वाढत्या संकटाचा पुन्हा एकदा क्रीडा जगतालाही फटका बसताना दिसतोय. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात देशांतर्गत स्तरावरील प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी सलग दुसऱ्यांदा रद्द करण्यात आली आहे. मागील हंगामातही ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. याशिवाय विजय मर्चेंट ट्रॉफी, सीके नायडू ट्रॉफी आणि अन्य देशांतर्गत स्पर्धा स्थगित करण्यात आला आहे.
कोरोनाचा खेळाडूंना फटका
याआधीही कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षी स्पर्धा स्थगित झाल्यानंतर खेळाडूंना मानधनही मिळाले नव्हते. पुन्हा एकदा खेळाडूंवर अशीच काहीशी वेळ येताना दिसते आहे. बीसीसीआयने मागील वेळी खेळाडूंच्या मानधनात निम्मी कपात केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.