Anurag Thakur Virat Kohli esakal
क्रीडा

कोणीही खेळापेक्षा मोठा नाही; विराट - रोहित वादावर क्रीडा मंत्री कडाडले

विराट - रोहित वादावर क्रीडा मंत्री कडाडले

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील वादावर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने केलेल्या वक्तव्यानंतर आता खुद्द देशाच्या क्रीडा मंत्र्यांनीही आपले मत व्यक्त केले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आज ( दि. 15 ) कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नाही असे वक्तव्य केले. (Sports Minister Anurag Thakur Statement Virat Kohli Rohit Sharma Rift)

मोहम्मद अझरुद्दीने (Mohammad Azharuddin) 'विराट कोहलीने बीसीसीआयला आपण एकदिवसीय मालिकेसाठी आपण उपलब्ध असणार नाही अशी माहिती दिली होती. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार नाही. ब्रेक घेण्यात काहीच गैर नाही मात्र ब्रेक घेण्याची वेळ चांगली नाही. यामुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात वाद आहेत हेच अधोरेखित होते.' असे वक्तव्य केले होते.

आता केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी 'खेळ हा सर्वोच्च आहे त्याच्यापेक्षा मोठे कोणच नाही. मी तुम्हाला कोणत्या खेळात कोणत्या खेळाडूंमध्ये काय सुरु आहे याची माहिती देऊ शकत नाही. हे काम संबंधित फेडरेशन किंवा असोसिएशनचे आहे. त्यांनीच यावर माहिती दिली तर बरं होईल.' असे म्हणत या विषयावर जास्त भाष्य करणे टाळले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्षही राहिले आहेत.

किर्ती आझाद (Kirti Azad) यांनीही विराट - रोहित मधील वादामुळे ते दोघे एकत्र खेळत नसतील तर त्याचा फटका टीम इंडियालाच (Team India) बसणार आहे असे मत व्यक्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT