चेसडॉम आयोजित 'टॉप चेस इंजिन चॅम्पियनशीप' स्पर्धे मध्ये होदिनी-६.०३ (रेटिंग ३१८४) चेस इंजिन ने कोमोडो-१९७० (रेटिंग ३२३२) वर ६ गुणांच्या फरकाने मात केली. १०० फेऱ्यांच्या सुपरफायनल मध्ये होदिनी चेस इंजिन ने १५ विजय, ७६ बरोबरी व ९ पराभव अशी दिमाखदार कामगिरी नोंदवली. १०० फेऱ्यांमध्ये होदिनीचे एकूण ५३ गुण झाले, तर कोमोडोचे ४७ गुण झाले. या स्पर्धेत ३००० हून अधिक रेटिंग असलेल्या जगातील एकूण २४ चेस इंजिन नी सहभाग नोंदवला. यातून पहिल्या ८ चेस इंजिन मध्ये प्रवेश केलेल्या इंजिन मध्ये स्पर्धा घेण्यात आली. यात होदिनी व कोमोडो या दोन चेस इंजिननी सुपर फायनल साठी बाजी मारली होती.
होदिनी-कोमोडो यांच्यातील १०० फेऱ्यांची थेट स्पर्धा ही टी. सी. ई. सी. च्या इतिहासातील पहिली स्पर्धा ठरली. होदिनीने यापूर्वी एकूण ५ वेळेस तर कोमोडोने एकूण ४ वेळेस सुपर फायनल गाठली होती. मात्र स्पर्धे पूर्वी या दोन्ही चेस इंजिनच्या नावावर समान तीन विजेतेपद होती.
जगातील सर्वोत्तम चेस इंजिन ठरविण्यासाठी सुपर फायनल मध्ये प्रत्येक दोन डावां साठी एक खास ओपनिंग, अशा एकूण ५० विविध ओपनिंग निवडण्यात आल्या. दोन्ही चेस इंजिनना काळ्या व पांढऱ्या बाजूने ही ओपनिंग खेळावी लागली. सुपर फायनल पूर्वी चेस इंजिन मध्ये बदल करण्याची मुभा प्रोग्रॅमर्सना देण्यात आली. ही कॉम्प्युटरची अधिकृत विश्वविजेतेपदाची लढत नसली, तरी चाहत्यांनी या स्पर्धेला विश्वविजेतेपदाची पसंती दिली. ७५ व्या फेरीत स्कॉच ओपनिंग पद्धतीत झालेला डाव २१३ चालीं पर्यंत रंगला व अखेर बरोबरीत सुटला. मात्र यावरून चेस इंजिननी विजयासाठी केलेला कडा संघर्ष समजून येतो.
ही स्पर्धा मुख्यत्वे करून दोन शक्तिशाली चेस इंजिन मधील असली तरी, प्रत्येक चाली गणिक चालींच्या विविध साखळ्या तपासण्या साठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील संबंध येतो. यासाठी 'प्रोसेसिंग पॉवर' महत्वाची ठरते. या स्पर्धेसाठी इंटेल झियॉन-२६९९ व्ही-४ या सर्व्हरची निवड करण्यात आली होती. यामध्ये दोन झियॉन चीपची म्हणजे एकूण ४४ कोअरची तरतूद करण्यात आली होती. कोअर आय-५, आय-७ या डेस्कटॉप व लॅपटॉप मध्ये शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या चीपच्या तुलनेत हा सर्व्हर खूपच शक्तिशाली होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.