Sreesanth Reaval how he trick west indies batsmen  esakal
क्रीडा

श्रीसंतने विंडीजच्या फलंदाजाला गंडवल्याचा केला खुलासा

सकाळ डिजिटल टीम

भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (S. Sreesanth) सध्या भारतीय क्रिकेट (Indian Cricket) वर्तुळात पुन्हा सक्रीय झाला आहे. मॅच फिक्सिंग (Match Fixing) प्रकरणातून त्याची मुक्तता झाल्यानंतर अनेक वर्ष त्याने क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी प्रयत्न केले. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. तो आयपीएलच्या लिलावात (IPL 2022 Auction) देखील उतरला होता. मात्र त्याच्या नावाचा उल्लेख देखील बीसीसीआयने करण्याचे टाळले होते. त्यानंतर तो केरळकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता. मात्र त्याला दुखापत झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या सर्व घटनांपूर्वी त्याने विजडेन इंडियाला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवेळी त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला चेंडू (Sreesanth Best Bowling) कधी टाकला होता हे सांगितले. तो म्हणाला की, त्याने कारकिर्दित अनेक चांगले चेंडू टाकले आहेत. विशेष करून 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना जॅक कॅलिसला (Jacques Kallis) एका बाऊन्सवर बाद करणे ही गोष्ट खूप खास होती. मात्र 2006 च्या विंडीज दौऱ्यावर ज्या पद्धतीने डॅरेन गंगाला (Daren Ganga) बाद केले होते तो माझा सर्वश्रेष्ठ चेंडू होता.

श्रीसंत या मुलाखतीत पुढे म्हणाला की, 'मी वेस्ट इंडीजच्या सलामीवीराला सपशेल गंडवले. त्याला मी दमलोय असा भास करून दिला. एवढंच काय तर समालोचकांना देखील असेच वाटले की मी दमलोय. मी चेंडू टाकण्याचा वेग कमी केला होता. तसेच मी सारखे माझ्या बुटाची लेस बांधत होतो. मी साधारणपणे सातवे किंवा आठवे षटक टाकत होतो. मला वाटते की फक्त मुनाफ पटेलला मी काय करतोय हे माहिती होते. तो माझ्याजवळ आला आणि त्याने 'नाटक कर रहा हैं!' असे म्हणाला. त्याला माहिती होते की मी इंडियन एअरलाईन्स आणि चेन्नई लीग सामन्यात अशीच रणनीती वापरायचो. मी माझ्या रणनीतीप्रमाणे काही कमी वेगाच्या चेंडूंनंतर एक वेगवान आऊटस्विंगर टाकला. गंगा या चेंडूवर बोल्ड झाला. हा माझ्या कारकिर्दितील सर्वश्रेष्ठ चेंडू होता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT