IPL 2021: चेन्नई : सलग तीन पराभवानंतर पंजाबविरुद्धच्या विजयाने संजीवनी मिळालेला हैदराबादचा संघ ताकदवर दिल्लीविरुद्ध कामगिरीत सातत्य राखणार का, याचे उत्तर उद्या रात्री होणाऱ्या आयपीएल सामन्यातून मिळणार आहे. गतस्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या दिल्लीने मुंबईचा पराभव करून आपली गाडी पुन्हा रुळावर आणली आहे. केन विल्यम्सन संघात आला आणि हैदराबादचा फलंदाजीचा प्रश्न सुटला पंजाबविरुद्ध १२० धावांचे आव्हान एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार करून त्यांनी विजयाकडे वाटचाल केली होती; परंतु फिरकीस साथ देणाऱ्या चेन्नईच्या खेळपट्टीवर आर. अश्विन आणि अमित मिश्रा असे सक्षम फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टॉ आणि केन विल्यम्सन यांच्यासाठी लढाई सोपी नसेल.
दिल्लीचाही संघ आता सावरत आहे. फलंदाजीत शिखर धवन तर फॉर्मात आहेच; पण गोलंदाजीतही निर्णायक कामगिरी करत आहेत. हुकमी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा अपयशी ठरत असला, तरी आवेश खान त्याची उणीव भासू देत नाही. सध्या ऑरेंज कॅप असलेल्या शिखर धवनचा फॉर्म कमालीचा आहे. खेळपट्टी कशीही असली आणि समोर गोलंदाज कोणीही असला, तरी तो वर्चस्व राखत आहे. दुसऱ्या बाजूला पृथ्वी शॉ आक्रमक फलंदाजी करत असला, तरी सातत्याचा अभाव आहे; परंतु आता स्टीव स्मिथ मधल्या फळीत खेळत असल्यामुळे समतोलपणा आला आहे. शिवाय रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमार असे फलंदाज स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हैदराबादच्या गोलंदाजांवर दडपण वाढणार आहे.
हैदराबादची गोलंदाजी पूर्णतः रशीद खानवर आधारलेली आहे; मात्र भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता त्यांच्याकडे दुसरा भरवशाचा गोलंदाज नाही.
रशीद खानचा धोका
दिल्लीची फलंदाजी पाहता ते रशीद खानची चार षटके सावधपणे खेळू काढतील आणि इतर गोलंदाजांवर हल्ला करतील, असा अंदाज आहे. खेळपट्टी साथ देणारी असल्यास केदार जाधवचा उपयोग केला जाऊ शकतो. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याची गरज संघाला लागली नव्हती.
गेल्या पाचपैकी तीन सामन्यात हैदराबादचा विजय
गत स्पर्धेत तीन सामने; त्यातील दोन हैदराबादने जिंकले
ठिकाण - चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
वेळ - सायं. ७.३० पासून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.