Sri Lanka vs Bangladesh 2nd Test : श्रीलंकेच्या पालेकेले मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (Pallekele International Cricket Stadium Sri Lanka) यजमानांनी बांगलादेशला 209 धावांनी पराभूत केले. या सामन्यातील विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने (Sri Lanka) पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 बाद 493 धावांचा डोंगर रचला होता. कॅप्टन आणि सलामीवीर करुणारत्ने (Karunaratne) 118 (190) आणि थिरिमाने (Thirimanne) यांनी 140 (298) संघाला दमदार सुरुवात करुन दिली. ओशादा फर्नांडो (Oshada Fernando) 81 (221) आणि डिक्वेला (Dickwella) यांनी 77 (72) धावांचे योगदान दिले.
बांगलादेशचा (Bangladesh) पहिला डाव 251 धावांत आटोपला. सलामीवीर तमिम इक्बाल (Tamim Iqbal) 92 (150), कर्णधार मोमीनूल (Mominul Haque) 49 (104) आणि रहिम (Mushfiqur Rahim) 40 (62) धावा वगळता कोणात्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या लेफ्ट आर्म स्पिनर प्रविण जयविक्रमानं पहिल्या डावात 6 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्याशिवाय चर्चा रंगली ती फुकाटची विकेट टाकणाऱ्या बांगलादेशच्या तैजुल इस्लामची (Taijul Islam). लकमलच्या गोलंदाजीवर त्याच्या विकेटच्या रुपात बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. तैजूलने चेंडू व्यवस्थितरित्या सिली पाँइटला खेळला. पण हा चेंडू खेळल्यानंतर त्याच्या पायातील बूट निसटले. बूट निसटल्यासोबतच त्याचा तोलही ढळला आणि पाय यष्टीला लागला. तो दुर्देवीरित्या हिट विकेट (hit wicket) बाद झाला. त्याच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खेळायला यायच्या आधी शूजची लेस नीट बांधायची असते, हे देखील खेळाडूला लक्षात ठेवायला लावणाराच हा व्हिडिओ आहे.
श्रीलंकेने दुसऱ्या डावात 9 बाद 194 धावांवर डाव घोषीत केला. दुसऱ्या डावात कर्णधार करुणारत्ने याने 78 चेंडूत 66 धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याच्याशिवाय धनंजय डी सिल्वाने 52 चेंडूत 41 धावा केल्या. 242 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 194 धावांच्या जोरावर श्रीलंकेने बांगलादेशसमोर 437 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचा दुसरा डाव 227 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेकडून प्रविण जयविक्रमा याने 5 विकेट घेतल्या. दुसऱ्या बाजूला 4 विकेट घेऊन मेंडिसने त्याला उत्तम साथ दिली.
Sri Lanka Bangladesh Taijul Islam slips his shoe and knocks the bails off the stumps Watch hit wicket Video
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.