Ind vs Sl 3rd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मालिकेच्या दृष्टीने काही फरक पडला नाही. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली होती. मात्र भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवत संपूर्ण जगासाठी हा सामना ऐतिहासिक बनवला.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पाच गड्यांच्या मोबदल्यात 390 धावा केल्या. यानंतर श्रीलंकेचा संघ 73 धावांत गारद झाला आणि 317 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकून विश्वविक्रम केला.
शुभमन गिल आणि विराट कोहलीने शानदार शतके झळकावली. मात्र, भारतीय संघासाठी आनंद साजरा करण्यासारखे बरेच काही असताना, श्रीलंकेला मोठा धक्का बसला. चौकार वाचवताना त्यांचे दोन खेळाडू गंभीर जखमी झाले. भारतीय डावादरम्यानच हा मोठा अपघात झाला, त्यामुळे सामना सुमारे 15 मिनिटे थांबवावा लागला.
भारतीय डावाच्या 43व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवर कोहलीचा फटका वाचवण्याच्या प्रयत्नात अशेन बंडारा आणि जेफ्री वेंडरसे यांच्यात टक्कर झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही खेळाडू जमिनीवर झोपले आणि खूप वेदना होत असल्याचे दिसून आले. घाईघाईत श्रीलंकेचे फिजिओ मैदानावर पोहोचले आणि त्यांनी तत्काळ उपचार केले, मात्र यामुळे दोन्ही खेळाडूंना फारसा दिलासा मिळाला नाही.
यानंतर मैदानावर स्ट्रेचर बोलावण्यात आले. श्रीलंकेच्या सहकारी खेळाडूंनी आणि कर्मचाऱ्यांनी या दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवर बाहेर काढले. वँडरसेला ताबडतोब कंसशन रिप्लेसमेंट करण्यात आले आणि त्याच्या जागी डुनिथ वेलाल्गेला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्याचवेळी अशेन बंडारा फलंदाजीला आला नाही. दोन्ही खेळाडूंना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.