Australia Vs Sri Lanka T20 World Cup 2022 ESAKAL
क्रीडा

AUS vs SL : लंकेची सुरूवात अन् शेवट झाला चांगला; ऑस्ट्रेलियासमोर 158 धावांचे आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

Australia Vs Sri Lanka T20 World Cup 2022 : यजमान ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पराभवाचा धक्का दिला होता. आता दुसऱ्या सामन्यात तुलनने दुबळा समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेनेही त्यांच्यासमोर विजयासाठी 158 धावांचे आव्हान ठेवले. श्रीलंकेकडून पथुम निसंकाने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर मधल्या फळीतील फलंदाज चरीथ असलंकाने 25 चेंडूत 38 धावांची आक्रमक खेळी करत लंकेला 150 च्या पार पोहचवले. धनंजया डि सेल्वाने 26 तर चमिका करूणारत्नने 7 चेंडूत नाबाद 14 धावांचे योगदान दिले. श्रीलंकनेने 20 षटकात 6 बाद 157 धावा केल्या.

पर्थवर नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कमिन्सने दुसऱ्याच षटकात श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज कुसल मेंडसला बाद करत हा निर्णय सार्थ ठरवले. मात्र त्यानंतर सलामीवीर पथुम निसंका आणि धनंजया डि सेल्वा यांनी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, डि सेल्वा 26 धावा करून बाद झाला. पाठोपाठ 45 चेंडूत 40 धावांची खेळी करणारा निसंका देखील माघारी गेला.

ऑस्ट्रेलियाने दहा ते 17 या षटकात श्रीलंकेच्या फलंदाजांना ठराविक अंतराने बाद करत त्यांची धावगतीही रोखली. यामुळे लंकेची अवस्था 17.3 षटकात 6 बाद 120 धावा अशी झाली होती. मात्र त्यानंतर असलंका आणि करूणारत्ने यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 37 धावांची भागीदारी रचली. असलंकाने 25 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या तर करूणारत्नेने 7 चेंडूत 14 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Assembly Election 2024 Result : देवेंद्र फडणवीस अभिमन्यू पवारांना मंत्री करणार; औसेकरांना विश्वास

Jalgaon Assembly Election 2024 Result : ब्रेक के बाद...गुलाबरावांची ‘हॅट्ट्रिक’; ‘जळगाव ग्रामीण’मधून 59 हजारांचे मताधिक्य

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

IPL 2025 Auction Live: मोहम्मद सिराजसाठी बंगळुरूने RTM चा पर्याय नाकारला अन् सिराज गुजरातमध्ये दाखल झाला

KL Rahul IPL Mega Auction 2025 : लोकेश राहुलला RCB ने दगा दिला, लखनौने RTM वापरण्यासही दिला नकार; बघा कुणी दिला त्याला आधार

SCROLL FOR NEXT