Suryakumar Yadav  Twitter
क्रीडा

SL vs IND : टीम इंडियाच्या विजयात सूर्याची चमक अन् भुवीची धमक

सूर्य कुमार यादवची अर्धशतकी खेळी

सुशांत जाधव

Sri Lanka vs India, 1st T20I : वनडे मालिकेतील विजयानंतर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी-20 कसोटी मालिकेत विजयी सलामी दिलीये. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान श्रीलंका संघासमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करता श्रीलंकेचा संघ 126 धावांत आटोपला. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 38 धावांनी विजय मिळवला. पहिल्या टी-20 सामन्यातील विजयासह टीम इंडियाने टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. (Sri Lanka vs India 1st T20I Suryakumar Yadav Fifty Dhawan Final Result)

भारतीय संघाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दीपक चाहर 2 तर कृणाल पांड्या वरुण चक्रवर्ती,युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. दीपक चाहर 2 तर कृणाल पांड्या वरुण चक्रवर्ती,युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी चरिथ अशलंका यांने 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 26 चेडूंत 44 धावांची सर्वोच्च खेळी केली.

सूर्यकुमार यादवची 34 चेंडूतील 50 धावांची धमाकेदार खेळी कर्णधार शिखर धवनच्या 46 धावांच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 165 धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. चमीराने पहिल्याच चेंडूव पृथ्वीला भनूका करवी झेलबाद केले. त्यानंतर शिखर कसोचधवन 46 (36) आणि संजू सॅमसन यांनी 51 धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. ही जोडी सेट होत असताना हंसरंगाने टीम इंडियाला दुसरा धक्का दिला.

जू सॅमसन 20 चेंडूत 27 धावा करुन माघारी फिरला. कर्णधार धवन आणि सूर्यकुमारने 62 धावांची भागीदारी करत संघाच्या डावाला आकार दिला. करुणारत्ने याने धवनच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. धवन बाद झाल्यानंतर सूर्याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. चौथ्या टी -20 सामन्यात त्याने दुसरे अर्धशतक झळकावत टीम इंडियाची धावसंख्या 150 + पार नेली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. श्रीलंकेकडून चमिरा आणि हंसरंगा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. करुणारत्नेला एक विकेट मिळाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT